कोरोनाबाधितांच्या मदतीला धावला देवदूत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाबाधितांच्या मदतीला धावला देवदूत

कुणाला वेळेवर उपचार मिळत नाही, तर कुणी ऑक्सिजन पुरवठ्याच्या कमतरतेचा बळी ठरत आहे.

घरमालकाने भाडेकरूने पैसे दिले नाही म्हणून त्याच्या राहत्या घराला आग लावली
नाईट हायस्कुल नाशिक शालेय् समितीच्या वतीने शुभ दिपावली स्नेह मेळावा
काँग्रेस पदाधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी : कुणाला वेळेवर उपचार मिळत नाही, तर कुणी ऑक्सिजन पुरवठ्याच्या कमतरतेचा बळी ठरत  आहे. यासर्वांमध्ये मुंबईत एक देवदूत लोकांच्या मदतीला धावून आला आहे शाहनवाज शेख असे या देवदुताचे नाव आहे. लोकांचा जीव वाचावा म्हणून त्यांनी स्वत:ची कार विकत लोकांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले आहे. तसेच लोकांना कशा प्रकारे ऑक्सिजन उपलब्ध करुन देता येईल, यासाठी तो जिवाचे रान करत आहेत. त्यांच्या याच धडपडीमुळे तो समस्त मुंबईत ऑक्सिजन मॅन म्हणून ओळखला जात आहेत. 

शाहनवाज शेख हा एका फोन कॉलवर कोरोना रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करत आहे. लोकांच्या मदतीसाठी तयार त्यांच्या टीमने यासाठी एक ‘कंट्रोल रुम’ही तयार केली आहे. जेणेकरुन रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळू शकेल. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात शाहनवाज शेख दिवसरात्र एक करून लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याच्या एका मित्राच्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती; मात्र वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मित्राच्या बहिणीचा रिक्षामध्येच मृत्यू झाला. याच गोष्टीचा शाहनवाज यांना धक्का बसला आणि त्यांनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम करण्याचे ठरवले.

मित्राच्या बहिणीचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्यानंतर शाहनवाज यांनी लोकांची मदत करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जमेल तेवढ्या लोकांना ऑक्सिजनचे सिलिंडल देण्याचे ठरवले. त्यासाठी भांडवल उभे करण्यासाठी त्यांनी स्वत:ची 22 लाख रुपयांची कार विकली. त्यातून त्यांनी 160 ऑक्सिजन सिलिंडर खऱेदी केले. तसेच 40 सिलिंडर भाड्याने घेतले. असे एकूण त्यांच्याकडे सध्या 200 ऑक्सिजनचे सिलिंडर आहेत. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या या कार्याचा अनेकांना फायदा झाला. गरजूंना ते ऑक्सिजनचे सिलिंडर देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये त्यांनी जवळपास चार हजार कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन सिलिंडर देऊन त्यांची मदत केली होती. शाहनवाज म्हणाले, की गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा परिस्थिती अधिक कठीण आहे. जानेवारीत ऑक्सिजन मागणीसाठी त्यांना 50 कॉल येत होते, तर आज दररोज 500 ते 600 फोन येत आहेत; पण दुर्दैव म्हणजे आता आम्ही केवळ 10 ते 20 टक्के लोकांपर्यंत पोहोचू शकलो आहोत.  ऑक्सिजन सिलिंडरसोबतच बेड, व्हेंटिलेटरची उपलब्धता या सर्व गोष्टींची माहिती ते याच वॉर रुममधून लोकांना देत आहेत. 

COMMENTS