Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी

अजित पवार नवे अध्यक्ष ः 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगात

नवी दिल्ली : राज्यात राजकीय घडामोडींना वेग येत असून, राष्ट्रवादी काँगे्रसमधून बाहेर पडलेले अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष आणि चिन्हावर

नैतिकता आणि भाजपमध्ये विरोधाभास ः शरद पवार
शरद पवारांना एनडीएत आणण्याचा होता डाव
राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

नवी दिल्ली : राज्यात राजकीय घडामोडींना वेग येत असून, राष्ट्रवादी काँगे्रसमधून बाहेर पडलेले अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष आणि चिन्हावर थेट दावा केला आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र दिले असून, त्यात राष्ट्रवादी काँगे्रसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करत, आपणच पक्षाचे नवे अध्यक्ष असल्याचा दावा केला असून, या ठरावाला पाठिंबा असणारे 40 आमदारांचे पत्र निवडणूक आयोगाकडे सादर केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष नेमका कुणाचा, या प्रश्‍नांचे उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगच घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असले तरी, त्यांच्याकडे संख्याबळ कमी असल्यामुळे आपणच या पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे याविरोधात शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. ज्या दिवशी शपथविधी झाला त्याच्या दोन दिवस आधीच अजित पवारांनी पक्षाच्या 40 आमदारांचे पत्र निवडणूक आयोगात दाखल केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यात राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत आहे. पक्षाचे विद्यमान अध्यक्ष असतांना, त्यांना विश्‍वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता कोणत्या गटाकडे पक्षाचे चिन्ह बहाल करतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून यापूर्वीच खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. अशातच प्रफुल्ल पटेल यांनी मोठा धक्का देत नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधतांना प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे की, मी जयंत पाटलांना अधिकृतरित्या कळवले आहे की, प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना मुक्त करतो. त्यांच्याजागी सुनिल तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहे. अपात्रतेची कारवाई पक्षाद्वारे होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाकडे याचा अधिकार नाही.

पक्षासह चिन्हावर केला दावा – राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष आता टोकदार बनत चालला असून अजित पवारांनी कायदेशीर लढाई सुरु केली आहे. पक्ष व पक्षचिन्हावर दावा ठोकला आहे. अजित पवारांनी कायदेशीर लढाई सुरु केली आहे. पक्ष व पक्ष चिन्हावर दावा ठोकला आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने लढण्यासाठी अजित पवार सज्ज झाल्याने महाराष्ट्राचे राजकारण येणार्‍या काळात आणखी टोकदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष व पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी दावा केल्याचे वृत्त आहे. निवडणूक आयोगाला अजित पवार यांचीराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळावर दावा करणारी याचिका प्राप्त झाली आहे. तर जयंत पाटील यांनी 9 मंत्र्यांच्या अपात्रतेची कारवाई करणारी कॅव्हेट निवडणूक आयोगाला दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

शरद पवार गटाचाही अर्ज दाखल – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, म्हणजेच शरद पवार गटानेही निवडणूक आयोगात अर्ज दाखल केला आहे. शरद पवारांनी केलेल्या अर्जानुसार निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाबाबत एकतर्फी निर्णय देता येणार नाही, त्यांना निर्णय देण्याआधी शरद पवार गटाची बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे, हे प्रकरण आता निवडणूक आयोगात गेले आहे. त्यानुसार अजित पवारांकडे पक्षाचे किती आमदार आणि खासदार आहेत याची माहिती द्यावी लागणार आहे.

COMMENTS