Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नैतिकता आणि भाजपमध्ये विरोधाभास ः शरद पवार

मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेनेचा संसदीय पक्ष अद्याप फायनल नाही. त्यामुळे ज्या राजकीय पक्षाच्या जोरावर लोक निवडणूक लढवतात, निवडून येतात त्या पक्षाचा आद

मविआ एकत्र निवडणूका लढवणार ः खा. शरद पवार
पक्ष आणि चिन्ह जावू देणार नाही
आपल्या मर्जीनुसार शरद पवार पक्ष चालवतात

मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेनेचा संसदीय पक्ष अद्याप फायनल नाही. त्यामुळे ज्या राजकीय पक्षाच्या जोरावर लोक निवडणूक लढवतात, निवडून येतात त्या पक्षाचा आदेश हा महत्वाचा आहे, हे कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितले आहे. त्युळे भाजपने नैतिकच्या बाता करू नये, कारण नैतिकता आणि भाजप यामध्ये विरोधाभास असल्याची टिप्पणी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार आणि नितीश कुमार यांनी एकत्रित घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोर्टाने अध्यक्षांवर अपात्रतेचा महत्वाचा विषय सोपवला आहे. बघुयात यावेळी अध्यक्ष कुठली भूमिका घेतात. कोर्टाचा निकाल ज्या कालावधी संदर्भातील आहे, यावर ते निर्णय घेतील. पण यासाठी त्यांच्यासमोर आमचे म्हणणे मांडण्याचे काम केले जाईल. विधानसभा अध्यक्ष हे पद एक इन्स्टिट्यूशन आहे आणि याची जबाबदारी ज्याच्यावर असते त्याने याचे पावित्र दाखवावे लागते. पण यावर आम्ही भाष्य करणे योग्य नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. हल्ली माझे एक पुस्तक प्रकाशित झाले यामध्ये हा विषय आहे यामध्ये मी स्पष्टपणे म्हटले आहे. यामुळे आमचे काही मित्र नाराज होते, पण ती वस्तुस्थिती होती त्यावर सुप्रीम कोर्टानेही भाष्य केले आहे. नैतिकता आणि बीजेपी यामध्ये विरोधाभास आहे, त्यामुळे यावर काय मत द्यायचे. राज्यपाल इथे असताना त्यांचा एकंदर अनुभव घेतल्यानंतर मी म्हटले होते की, घटनेत राज्यपाल ही एक संस्था आहे. त्या इन्स्टिट्युशनची अप्रतिष्ठ कशी केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रात त्या काळात पहायला मिळाले होते. सुदैवाने आज ते इथे नाहीत त्यामुळे जास्त भाष्य करणे योग्य नाही, असेही पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बोलताना सांगितले.

आता भाजपविरुद्ध प्रचार करणे सोपे जाईल ः – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता भाजपविरुद्ध प्रचार करणे आम्हाला सोपे जाईल, महाविकास आघाडी एकत्र मिळून आता अधिक जोमाने काम करू, असेही ते म्हणाले आहेत. पवार म्हणाले की, कोश्यारीचे नाव हे लोकांच्या सतत लक्षात राहील, राज्यपालांची नियुक्ती चुकीची केली जाते याचे कोश्यारी उदाहण आहेत, असा टोला पवारांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

…तर, शरद पवार देशाचे नेतृत्व करतील ः नितीशकुमार – देशात आजच्या घडीला विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे असून, विरोधकांची मोट बांधण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असून, भविष्यात विरोधकांची एकत्र मोट बांधली तर, शरद पवार देशाचे नेतृत्व करतील, असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केले. मुंबईमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप देशहिताच्या विरोधात काम करत आहे. शरद पवार हे विरोधकांचा चेहरा झाले तर आनंदच आहे. देशात महाआघाडी करण्याचा आमचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS