Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पक्ष आणि चिन्ह जावू देणार नाही

शरद पवारांचा पदाधिकार्‍यांच्या बैठकीत एल्गार लोकशाहीत पक्षाचा ताबा घेणे अयोग्य

मुंबई/प्रतिनिधी ः आज माझा फोटो जे लावत आहेत, त्यांना माहिती आहे, की आपले नाणे चालणार नाही, आणि वाजणार नाही, त्यामुळेच त्यांनी माझा फोटो वापरणे सु

कांदा निर्यातबंदी दिल्लीश्‍वरांना उठवावीच लागेल
कोणताच धर्म चुकीच्या प्रवृत्तीचे समर्थन करत नाही
एकीकडे टीका, दुसरीकडे एकाच गाडीतून प्रवास

मुंबई/प्रतिनिधी ः आज माझा फोटो जे लावत आहेत, त्यांना माहिती आहे, की आपले नाणे चालणार नाही, आणि वाजणार नाही, त्यामुळेच त्यांनी माझा फोटो वापरणे सुरु केले आहे. त्यांनी त्यांच्यासोबत कितीही आमदार आणि खासदार नेले असले तरी, मी पुन्हा जनतेत जावून कौल मागणार आहे. त्याचबरोबर कितीही संकटे आली, कोणतीही लढाई लढावी लागली तरी, पक्ष आणि चिन्ह हातातून जावू देणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकार्‍यांची बुधवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक घेण्यात आली, यावेळी मार्गदर्शन करतांना शरद पवार बोलत होते.

मला पांडूरंग म्हणायचे आणि आमच्याकडे दुर्लक्ष केले गेले असे सांगायचे असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. भोपाळच्या सभेमध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँगे्रसला भ्रष्टाचारी म्हटले, पण दोन दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कशी शपथ दिली असा सवाल देखील त्यांनी पंतप्रधान मोदींना उपस्थित केला. विरोधकांना एकत्रित करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे पंतप्रधान अस्वस्थ झाल्याची टीकाही यावेळी पवार यांनी केली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वाटचालीबद्दल बोलताना म्हणाले की, आज राष्ट्रवादीच्या स्थापनेला 24 वर्षे पूर्ण झाली, या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात राष्ट्रवादीची फळी तयार केली. यामध्ये अनेकजण आमदार, खासदार आणि मंत्री झाले. राष्ट्रवादीने अनेक नवीन नेते तयार केले. या नेत्यांना तयार करताना त्यांना महाराष्ट्राचा चेहरा बनवायचा होता, राज्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचायचे हा विचार होता. शरद पवार म्हणाले की, आज आपल्यासमोर संकटे आहेत, ज्यांचे विचार देशाच्या हिताचे नाहीत त्यांच्या हातात आज देशाची सूत्रे आहेत. केंद्रामध्ये मी अनेकांच्या मंत्रिमंडळात काम केले. लोकशाहीमध्ये विरोधी असो वा सहकारी असोत, त्यांच्यात सुसंवाद असावा लागतो. जो काही निर्णय घेतला जातो त्यावर सर्वसमान्यांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घ्यावे लागते. आज देशामध्ये हा संवाद नाही. देशातील विरोधक एकत्र येत असताना ज्यांच्या हातात सत्ता आहे ते अस्वस्थ होताना दिसत आहेत असं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी सांगितलं की राष्ट्रवादीने 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. एकदा पंतप्रधान बारामतीत आले होते, त्यावेळी ते म्हणाले की पवार साहेबांचे बोट धरून मी राजकारणात आलो. त्यानंतरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. दरम्यान राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीला 18 आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

बापाचा नाद करायचा नाही ः सुप्रिया सुळेंचा इशारा – प्रख्यात कवी दा. सू. वैद्यांनी माझ्यासाठी एक कविता लिहिलेली होती. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी. लढणार्‍या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी. हा बाप माझ्या एकटीचा नाही, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही, असे म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. आमच्यावर टीका करा, पण बापावर जायचे नाही, असा दमच त्यांनी यावेळी दिला. जेव्हा घरावर जेव्हा अडचण येते तेव्हा आई वडिलांसोबत सर्वात आधी लेक उभी राहते. यातून हरुन जायचे नाही. पक्ष आहे पुन्हा बांधू. जे आहेत त्यांच्यासाठी आनंद आहे. पण आता जे गेले त्यांना शुभेच्छा असल्याचे देखील सुळे यावेळी म्हणाल्या.

माझ्या फोटोशिवाय त्यांचे नाणे वाजणार नाही – काही लोकांचा आज मेळावा झाला. त्या मेळाव्याला माझा फोटो होता. गुरू म्हणायचे, पांडुरंग म्हणायचे. आणि माझ्याकडे दुर्लक्ष झाले असे म्हणत आरोप करायचा, याला काही अर्थ नाही. अशी टीका शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, काही लोकांनी आत्ताच मेळावा घेतला. त्यात सर्वात मोठा फोटो माझा होता. मी नकार देऊन देखील त्यांनी माझा फोटो वापरला. कारण, त्यांना माहित आहे की, त्यांचे नाणे खणखणीत नाही. माझा फोटो वापरल्याशिवाय त्यांचे नाणे खणखणीत वाजणार नसल्याची टीका शरद पवार यांनी केली.

COMMENTS