Homeताज्या बातम्या

हिमाचल प्रदेशमध्ये दरीत वाहन कोसळून सात जणांचा मृत्यू

चंबा (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुखरी उ

देशात भ्रष्टाचारामुळे मोठी अराजकता; काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका; संगमनेरच्या सहकार पंढरीला भेट
नांदेडच्या राजकारणात “अदृश्य डावपेच” : खा. चव्हाणांना घेरण्याची रणनीती? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीतच संशयाचे सावट; अंतर्गत संघर्ष उघड
पॅरिसमध्ये हिंसक थरार! चॅम्पियन्स लीग विजयाच्या जल्लोषाला गालबोट; २१९ जण जखमी

चंबा (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुखरी उपविभागातील चंबा-मसरुंड मार्गावर छतरुंड परिसरात प्रवासी वाहन खोल दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, महाल गावातील काही नागरिक शेजारच्या गावात आयोजित मुंडन संस्कार सोहळ्यास उपस्थित राहून परतत होते. कार्यक्रम आटोपून सर्वजण वाहनातून आपल्या गावाकडे निघाले असताना छतरुंडजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्याबाहेर जाऊन खोल दरीत कोसळले. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला व पुरुषांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावून आले. त्यांनी दरीत उतरून बचावकार्य सुरू केले आणि मृतदेह तसेच जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर पोलीस आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली व मदतकार्याला वेग देण्यात आला.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी पुरेशा सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याची खंत व्यक्त केली आहे. रस्त्यालगत संरक्षक कठडे नसल्यामुळे अपघाताचे गांभीर्य वाढल्याचा दावा त्यांनी केला. योग्य सुरक्षा व्यवस्था असती तर जीवितहानी टाळता आली असती, असे मतही नागरिकांनी व्यक्त केले. पोलीस प्रशासनाने या दुर्घटनेची नोंद घेतली असून अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. मृत व जखमींची संपूर्ण माहिती संकलित केली जात असून सर्व बाबींचा तपास केला जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

COMMENTS