Homeताज्या बातम्या

श्री क्षेत्र चाकरवाडी येथे ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या २६ व्या पुण्यस्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

दिग्गज कीर्तनकारांची होणार मांदियाळी बीड (प्रतिनिधी) : सद्गुरू श्री. संत वै. ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या २६ व्या (सहवीसव्या

सरकारच्या उशिरा कर्जमाफीचा शेतकऱ्यांना मोठा फटका; महागडी बियाणे-खते खरेदीसाठी शेतकरी सावकारांच्या दारात
कलम ३७० हटवल्याने काश्मीर बनले गुंतवणुकीचे ‘नंदनवन’; उद्योगांमध्ये विक्रमी वाढ
घाटघर परिसरातील उंबरदरा येथे अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

दिग्गज कीर्तनकारांची होणार मांदियाळी

बीड (प्रतिनिधी) : सद्गुरू श्री. संत वै. ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या २६ व्या (सहवीसव्या) पुण्यस्मरणार्थ श्री क्षेत्र चाकरवाडी (ता. जि. बीड) येथे अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शांतिब्रह्म गुरुवर्य महादेव महाराज (तात्या) चाकरवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, २२ जून २०२६ ते सोमवार, २९ जून २०२६ या कालावधीत हा सोहळा पार पडणार असून, भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. महादेव महाराज यांनी केले आहे.

या अखंड हरिनाम सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम खालीलप्रमाणे असतील:

  • पहाटे ४ ते ६ : काकडा भजन
  • सकाळी ६ ते ७ : श्रीविष्णूसहस्त्रनाम पठण
  • सकाळी ११ ते दुपारी १ : गाथा भजन
  • दुपारी २ ते ५ : श्रीमद् भागवत कथा (निरूपण: भाषाप्रभू ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील, संस्थापक – श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय, सरळंबे/मुंबई)
  • सायंकाळी ५ ते ६ : अभंगवाणी संगीत भजन
  • सायंकाळी ६ ते ८ : संकीर्तन सेवा
  • रात्री ८:३० ते १०:३० : हरिकीर्तन
  • रात्री १०:३० नंतर : हरी जागर व भारुड

अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन सेवा खालीलप्रमाणे :

  • सोमवार, २२ जून २०२६ : ह. भ. प. लक्ष्मण महाराज मेंगडे (श्री बंकट स्वामी मठसंस्थान, श्री क्षेत्र नेकनूर)
  • मंगळवार, २३ जून २०२६ : भागवताचार्य ह. भ. प. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री (श्री रत्नेश्वर संस्थान, श्रीक्षेत्र टोकवाडी)
  • बुधवार, २४ जून २०२६ : भाषाप्रभू ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील (संस्थापक – श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय, सरळांबे/मुंबई)
  • गुरुवार, २५ जून २०२६ : व्याकरणाचार्य ह. भ. प. अर्जुन लाड गुरुजी महाराज (श्री संत भगवानबाबा वा.शि.सं., श्रीक्षेत्र होळ)
  • शुक्रवार, २६ जून २०२६ : भागवताचार्य ह. भ. प. विशाल महाराज खोले (श्रीक्षेत्र मुक्ताईनगर)
  • शनिवार, २७ जून २०२६ : वाणीभूषण ह. भ. प. जयवंत महाराज बोधले (श्रीक्षेत्र पंढरपूर)
  • रविवार, २८ जून २०२६ : ज्ञानसिंधू ह. भ. प. संदीपान महाराज शिंदे हासेगावकर (अध्यक्ष – श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्रीक्षेत्र आळंदी)
  • सोमवार, २९ जून २०२६ (वटपौर्णिमा) : वारकरी संप्रदाय भूषण रामायणाचार्य ह. भ. प. रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचे ‘काल्याचे कीर्तन’ (वेळ: सकाळी १० ते १२). यानंतर महाप्रसाद व महापंक्तीचे आयोजन करण्यात आले आहे.

या संपूर्ण सोहळ्यास महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, दिग्गज गायनाचार्य व वादनाचार्य यांची सेवा लाभणार आहे.

COMMENTS