Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाजार समिती उपसभापतीपदी सविता तुंगार बिनविरोध 

पंचवटी - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी सविता तुंगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रोटेशनप्रमाणे उत्तमराव खांडबहाले यांनी उपसभ

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासंदर्भातली याचिका फेटाळली | LOKNews24
उसतोड कामगारांना प्रतिटन सातशे रूपये भाव द्यावा
गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला; लिलाव रक्कम अडकली, तरुणाने जिल्हाधिकार्‍यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली; तहसीलदारांसह सहा अधिकार्‍यांवर गंभीर आरोप; अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी तरुणाचा टोकाचा इशारा

पंचवटी – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी सविता तुंगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रोटेशनप्रमाणे उत्तमराव खांडबहाले यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. शनिवारी (ता.०६ ) रोजी सकाळी ११ वाजता बाजार समिती कार्यालयात ही निवडप्रक्रिया पार पडली. बाजार समितीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित उपसभापतीपदी सविता तुंगार  यांनी दिली.   

सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शनिवार (ता.०६) सकाळी साडे दहा वाजता माजी खासदार सभापती देविदास पिंगळे यांच्यासह , माजी उपसभापती उत्तमराव खांडबहाले, संचालक संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, तानाजी करंजकर, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील,राजाराम धनवटे ,भास्करराव गावित, निर्मला कड, विनायक माळेकर, जगन्नाथ कटाळे,व्यापारी प्रतिनिधी संदीप पाटील, जगदीश आपसुंदे,हमाल मापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम आदीसह संचालक बाजार समितीमध्ये दाखल झाले. सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक संदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. उपसभापतीपदासाठी  सविता तुंगार यांचा एकमेव अर्ज भरल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तसेच यावेळी बाजार समिती सचिव आर. एन. घोलप व एन एल बागुल, मुख्य लिपिक एम डी पाटील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील राजेश आव्हाड उपस्थित होते.तसेच  शिंदे गावातील विविध कार्यकारी सोसायटी सभापती, उपसभापती जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ, यांचे सह शेतकी तालुका संघाचे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते

सभापती देविदास पिंगळे व सहकारी संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकत उपसभापतीपदी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानते. आजवर शेतकरी हिताचीच कामे करीत आले आहे. यापुढेही ही कामे करीत राहील. सभापती व संचालक मंडळाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.

COMMENTS