Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलवाडा ग्रामपंचायत मध्ये सरपंच पतीचा हस्तक्षेप ; उपसरपंचा सह सदस्य नाराज…

बोगस कामाची चौकशी करून कार्यवाही करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

गेवराई प्रतिनिधी - गेवराई.तालुक्यातील  तलवाडा  ग्रामपंचायत च्या कामात सतत अनियमीतता, 15 व्या वित्त आयोगाच्या कामात बोगसगीरी, भ्रष्टाचार तसेच दलित

सल आणि सूड ! 
पत्नीचा गळा चिरला, मग उकळते तेल टाकले; चारित्र्याच्या संशयावरून केली हत्या
भारतीय संघाच्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारत आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमध्ये नंबर 1 वर

गेवराई प्रतिनिधी – गेवराई.तालुक्यातील  तलवाडा  ग्रामपंचायत च्या कामात सतत अनियमीतता, 15 व्या वित्त आयोगाच्या कामात बोगसगीरी, भ्रष्टाचार तसेच दलित वस्ती योजने अंतर्गत विशेष घटक विहीरीचे काम पूर्ण न करता पैसे उचचले बाबत संबंधीतावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी लेखी मागणी सत्ताधरी उपसरपंच आक्रम सौदागर तसेच ग्रामपंचायत सदस्य बळीराम अण्णा शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत जिल्हाधिकारी,  मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी काय भूमिका घेतात याकडे तलवाडा गावच्या नागरिकांचे लक्ष लागले असून  जर चौकशी करून कार्यवाही झाली नाही तर येत्या काळात लोकशाही मार्गाने उपोषण /आंदोलन करण्यात येईल असा इशारा आक्रम सौदागर आणि बळीराम शिंदे यांनी दिला आहे.
तलवाडा ग्रामपंचायत ता. गेवराई जि.बीड येथील ग्रामपंचायत च्या कामात सरपंच पति हस्तक्षेप करत असुन प्रशासकीय कामात अडथळा निर्माण करतो. तसेच 15 व्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत करण्यात आलेले कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहेत. या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी. तसेच अंबिका नगर तलवाडा या वस्तीसाठी दलित वस्ती योजने अंतर्गत विषेश घटक मधून नऊ लक्ष रुपये निधीची पाणी पूरवठा योजना पूर्णस्तास न नेता निधी उचलला आहे. यामध्ये तलाव, विहीर खोदकाम, तलाव ते अंबीका नगर पाण्याच्या टाकी पर्यंत पाईप लाईन असतांना जुन्याच पाईप लाईन दाखवून दोन लक्ष नव्यान्नव हजार रुपये निधी उचलला, सदरील ठिकाणी पूर्वीपासून गाव अंतर्गत विहीर (बारव) या ठिकाणाहून पाणी पूरवठा सुरळीत होता. त्यामुळे विशेष घटक योजनेच्या कामात पुर्णपणे भ्रष्टाचार झाला आहे. (व्हाऊचर क्र. जथछ/2021-22/झ/54) सदरील कामाची चौकशी करुन संबंधीत अधिकारी व काम करणारे सरपंच पती यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अंबिका नगर येथे ग्रा.प. मार्फत सुरळीत पाणी पुरवठा सुरु असतांना विशेष घटक योजने अंतर्गत नऊ लक्ष रुपयाचे काम अपूर्ण ठेवून निधी हडप केला आहे. तलवाडा ग्रामपंचायत येथे जलजीवन योजनेचे 14 कोटी रुपयाचे कामाचे उद्घाटन होवून सध्या काम प्रगतीपथावर असून यामध्ये तलवाडा, अंबिकानगर यासह वाडी वस्ती, तांडे येथे सदरील योजनेचे अंतर्गत काम करण्यात येणार असून सर्वांना पाणी पुरवठा होणार आहे. तरीही निधी हडप करण्याच्या उद्देशाने आराखडा मध्ये असलेले पोईतांडा येथील सौर उर्जा आधारीत विद्युत मोटार व वाटर मिटर या कामाचा एकून दहा लाख एकोनपन्नास हजार रुपयाचा निधी बोगस ग्रामसभा/ मासिक सभेचा ठराव दाखवून काम बदलून चव्हाणवाडी येथून अंबिका नगर येथे पाणी पुरवठा काम करण्यासाठी प्रस्तावित केले जेकी पूर्ण निधी हडपण्याच्या उद्देशाने आहे. सदरील काम बदल करुन मंजूर करणे बाबतचा जो ठराव आहे त्या मध्ये सुचक व अनुमोदक यांच्या सह्या डूबलीकेट आहेत व तो ठराव सदस्यांच्या परस्पर लिहण्यात आलेला आहे. यामध्ये प्रस्तावासोबत दि.02/05/2023 रोजीचा मासिक सभा ठराव क्र. 10 अन्वये काम बदल केले असून प्रस्तावित मंजूर कामाच्या पत्रात ग्रामसभा दि. 02/05/2023 ठराव क्र. 10 असा उल्लेख असून 2 मे 2023 रोजी ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. वरील सर्व कामाची रितसर चौकशी करुन संबंधीत सरपंच, सरपंच पती व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
महिला सरपंच अधिकारी  पती   कारभारी….
महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने पंनास तक्के आरक्षण देण्यात आले असून निवडणुकी मध्ये ही राखीव जागा ठेवून त्यांना हकक आणि अधिकार देण्याचे शनाचे धोरण आहे,परंतु ग्रामीण भागात  पुरुषी मी पना  पुढे येत महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम होत आहे,अनेक ठिकाणी पत्नीच्या पदाचा वापर पती करत असल्याने कामे व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी आहेत ,हे बंद होणे काळाची गरज असून याबाबत लोकाशा मध्ये वेळोवेळी आवाज उठण्याचे काम झाले आहे.
सत्ताधरी सरपंच आणि सरपंच  पतीच्या विरोधात  सत्ताधारी उपसरपंच,सदस्य…..
तलवाडा ग्रामपंचायत मध्ये सद्या अवमेळ असल्याने विकास कामे रखडली आहेत,ग्रामपंचायत च्या कामात सरपंचाचे पती प्रमाणापेक्षा हस्तक्षेप करत असल्याचे जाणवत असल्याची जाणीव उपसरपंच आणि सदस्यांना लागल्याने त्यांनी सरपंच हटाव आणि सरपंच पतीचा अवैध कारभार बंद करावा यासाठी सत्ताधारी उपसरपंच यांनी सत्ताधारी सरपंच तसेच सरपंच पती यांच्या विरोधात मा.जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे

COMMENTS