Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलात गुणवत्तापूर्ण संस्कार रुजविण्याचे काम अध्यापनातून केले जाते- डॉ हेमंत वैद्य

संस्था वर्धापन दिन व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

माजलगाव प्रतिनिधी - भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा 72 वा वर्धापन दिन येथील श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी 8:

उर्फी जावेदचा नवीन हटके ड्रेस, चाहत्यामध्ये चर्चेला आलीय रंगत
माजी उपमहापौर कोतकरांना अखेर अटकपूर्व जामीन मंजूर
शेतकर्‍यांना त्वरित नुकसानभरपाई द्या

माजलगाव प्रतिनिधी – भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा 72 वा वर्धापन दिन येथील श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी 8:30 संस्थेचे कार्यवाह डॉ हेमंत वैद्य यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण व भारत माता पूजन करण्यात आले.
यानंतर गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात सांघिक पद्य, दीप प्रज्ज्वलन व माता सरस्वती, भारत माता पूजन करुन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्यवाह डॉ हेमंत वैद्य, प्रमुख अतिथी जेष्ठ साहित्यिक प्रभाकर साळेगावकर, विशेष उपस्थितीत केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाशभाऊ दुगड, अमरनाथ खुर्पे, विष्णुपंत कुलकर्णी तसेच व्यासपीठावर प्राचार्य डॉ सुहास मोराळे, मुख्याध्यापक अनंतराम कोपले सर, सीबीएसई च्या श्रीमती वंदना मिटकरी उपस्थित होते. यावेळी डॉ हेमंत वैद्य यांनी सांगितले की, श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलात गुणवत्तापूर्ण संस्काराची रुजवण अध्यापनातून केली जाते, तसेच जो इतिहास आठवतो व विसरत नाही तोच जीवनात यशस्वी होतो. राष्ट्र हिताच्या विचाराचा वारसा घेऊन संस्था वाटचाल करत आहे व मराठवाड्यात संस्थेचे नावलौकिक आहे. समाजाचे हित प्रजेचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष भारतीय शिक्षण प्रसारक संस्था साजरा करत आहे. यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थी यांचे अभिनंदन करुन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रमुख अतिथी जेष्ठ साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांनी प्रेरक काव्य सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आपण दिसण्यापेक्षा असण्याला महत्व दिले पाहीजे. यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी माध्यमिक विभागात होणारे उपक्रम, कार्यक्रमाची माहिती पालकांपर्यत पोहचावेत यासाठी तंत्र शिक्षक मुकेश काळे यांनी तयार केलेले  ’एसएसएमव्हीएम’ या अ‍ॅपचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संस्था परिचय देताना मुख्याध्यापक अनंतराम कोपले सर यांनी संस्थेची स्थापना, वाटचाल व कुलाचार, विद्यासभेची रचना त्यातून विद्यार्थ्यांची जडणघडण कशाप्रकारे केली जाते हे सांगितले. आभार माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विठ्ठल काळे  सर यांनी केले तर सुत्रसंचालन श्रीमती सुनंदा खांडेकर यांनी केले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांसाठी समाज, शिक्षक कर्मचारी, इतर दात्यांनी जाहिर केलेल्या बक्षीस/ रकमेचे वाचन करण्यात आले. बक्षीसाचे वाचन प्रभाकर बनसोडे, प्रा डॉ कमलकिशोर लड्डा यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली शांती मंत्र रवींद्र खोडवे यांनी सांगितला. यावेळी संस्था पदाधिकारी, सभासद, गुणवंत विद्यार्थी, पालक, तसेच माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विठ्ठल काळे सर, पर्यवेक्षक रवींद्र खोडवे, सदाशिव ढगे, सुर्यकांत उजगरे, कमलाकर झोडगे सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS