Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजी भिडेचा पाय आणखी खोलात

तुषार गांधी यांनी केली पुणे पोलिसांत तक्रार

पुणे/प्रतिनिधी ः श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या आक

पंजाबमध्ये भरधाव रेल्वेचे आठ डबे झाले वेगळे
ओमायक्रॉनमुळे भारतावर येऊ शकते आर्थिक संकट ?
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी साधला संवाद

पुणे/प्रतिनिधी ः श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर आक्षेप घेत महात्त्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी आक्रमक भूमिका घेत पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी तुषार गांधीसोबत असीम सरोदे, विश्‍वंभर चौधरी, अन्वर राजन उपस्थित होते.

तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, या तक्रारीची दखल घेऊन तपास करु योग्य कारवाई करु, न्यायावर आमचा विश्‍वास आहे. मात्र त्यांचे पाय कोणी बांधून ठेवले आहेत का?, असा प्रश्‍न अनेकदा उपस्थित होतो. त्यामुळे न्यायालयाच्या दरवाज्यात जाण्यासाठीची पहिली पायरी तक्रार देऊन ओलांडली आहे, असे तुषार गांधी म्हणाले. गांधी घराण्यातील स्त्रियांचा अपमान आणि बेअब्रू केली आहे. ही गांधी घराण्यातील सगळ्याच पिढ्यांची बेअब्रू आहे. त्यामुळे बेअब्रू करणे, महिलांचा अपमान करणे, लोकांच्या मनात अनेक गोष्टींबाबत भेदभाव निर्माण करणे, गुन्हेगारी स्वरुपाचा वक्तव्य करणे आणि संगनमताने अशाप्रकारे कृत्य करणे त्यासोबतच समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य या सगळ्या कलमांअंर्तगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रार नोंदवण्यात आली आहे, असे सरकारी वकील असिम सरोदे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर म्हटले आहे. एखाद्या ठिकाणी भाषण करायचे आणि त्याची चित्रफित करुन समाज माध्यमांवर टाकायचे. करोडो लोकांनी ही चित्रफित बघितली आहे ऐकली आहे त्यामुळे संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशा स्वरुपाची तक्रार डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. संभाजी भिडे विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, या मागणीसाठी विविध संघटना रस्त्यावर उतरले आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यलयावर मोर्चा घेऊन आंदोलक निघाले आहेत. संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात आंदोलन करण्यात आले. भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रसने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

COMMENTS