Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे – अ‍ॅड. देशमुख

अकोले/प्रतिनिधी ः आपण ज्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिकतो तेथील संस्कार व मार्गदर्शन हे आपल्या भावी आयुष्यात दिशा देणारे असते.त्याची परतफेड कराय

पाण्याच्या वादातून कोयत्याने वार
अँग्लो उर्दू हायस्कूलला 24 संगणकांची भेट
एकमेकांच्या नगरसेविका फोडल्या…भाजप नगरसेवकांतील गटबाजी शिगेला

अकोले/प्रतिनिधी ः आपण ज्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिकतो तेथील संस्कार व मार्गदर्शन हे आपल्या भावी आयुष्यात दिशा देणारे असते.त्याची परतफेड करायची असेल तर मागे वळून पाहिले पाहिजे. व महाविद्यालय विकासात माजी विद्यार्थ्यांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन अँड.मनोहरराव देशमुख( अध्यक्ष, सत्य निकेतन संस्था राजुर) यांनी केले.

ते अँड.एम.एन.देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थी पालक संघ समिती व माजी विद्यार्थी संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.एम.एल. मुठे (विश्‍वस्त, सत्यनिकेतन संस्था राजुर) हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी केले.आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगती विषयी सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमात मा. श्री टी.एन.कानवडे सचिव सत्यनिकेतन संस्था यांनी देखील विचार व्यक्त केले. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघाने यापुढील काळात भरीव असा निधी स्थापन करून महाविद्यालयाला मदत करावी  असे विचार मांडले. तसेच माजी विद्यार्थी प्रा.नितीन तळपाडे, श्री राहूल भांगरे(शास्त्रज्ञ), श्रीमती कमल देशमुख ,गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी प्रमूख अतिथींच्या हस्ते माजी विद्यार्थी संघाच्या फलकाचे अनावरण यावेळी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर  चिमणराव देशमुख एम.एल. मुठे, एस.टी.येलमामे, मिलिंद उमराणी, गोकुळ कानकाटे, संतोष मुतडक, लेंडे, परबत, शशिकांत ओहरा, नितीन तळपाडे, राहुल भांगरे, प्रा.विनोद येलमामे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव आदि मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने सर्व शिक्षक वृंद व पदाधिकार्‍यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. तर नैपुण्य प्राप्त माजी विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालय व सत्य निकेतन संस्थेच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. रोहीत मुठे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश मैड यांनी केले.

COMMENTS