Homeताज्या बातम्यासंपादकीय

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची सुरक्षा ऐरणीवर  

अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या कर्मचार्‍यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा घटनांमुळे अत्यावश्यक सेवेचा भाग असलेले कर्मचारी नाराज होत

वाढते हल्ले चिंताजनक  
हिंडेनबर्गचे भूत पुन्हा सज्ज
थेट भरतीचा घाट कशासाठी ?

अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या कर्मचार्‍यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा घटनांमुळे अत्यावश्यक सेवेचा भाग असलेले कर्मचारी नाराज होत आहेत. अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या संस्था तसेच अस्थापनांनी यावर बारकाईने लक्ष्य देण्याची गरज निर्माण झाली आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या संस्थेत कार्यरत असलेले डॉक्टर, महावितरणचे कर्मचारी, अन्न-धान्य पुरवठा करणारी दुकाने अथवा वाहने व त्यांचे चालक यांना पोलीस संरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला होता. याचाच फायदा घेत वैद्यकिय सेवा देणार्‍या निवासी डॉक्टरांवर नऊ वेळा हल्ले केले. नुकतेच बारामती तालुक्यातील मोरगावमध्ये 24 एप्रिल रोजी माणूसकीला महावितरणच्या कार्यालयात जावून अभिजीत दत्तात्रेय पोटे याने 570 रुपयांच्या वीजेच्या बिलाच्या कारणामुळे वरिष्ठ तंत्रज्ञ सौ. रिंकू गोविंदराव बनसोडे यांची कोयत्याचे 16 वार करुन हत्या केली. या घटनेमुळे महावितरणच्या वीज कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्र राज्यात 1 मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो. मात्र, कामगार दिनाच्या आदल्या दिवशीच कामगारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बारामती शहरात मूक कॅण्डल मोर्चा महावितरणच्या कर्मचार्‍यांना काढावा लागला. या घटनेबाबत एकाही राजकर्त्याने तोंडातून ब्र शब्दही काढला नाही, ही संयुक्त महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आपण स्वत: वापर केलेल्या ऐशोआरामाचे बिल मागण्याची अथवा देण्यासही आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना बॉडी गार्ड घेऊन थांबायचे का? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. कर्मचार्‍यांबाबतचा प्रकार असा होत असतानाच शासकिय कार्यालये लक्ष्य करण्यावरही लोकांचा डाव असतो. या अशा दहशत माजवण्याच्या हेतूने केलेल्या कृत्याचा शेवट शांततेत न होता शासकिय कर्मचार्‍याच्या जीवावर बेतत आहे. अशा प्रकारचे हल्ले कोणतेही आंदोलन म्हटले की, राज्य परिवहन विभागाच्या गाड्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार अलीकडे वाढत चालले आहेत.

या प्रकारामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होवून जनता हतबल होते. मात्र, आंदोलकांना शांत करताना पोलीस प्रशासन जेरीस येत असल्याचेही पहावयास मिळत आहे. असे प्रकार वाढण्याने समाजिक शांतता भंग होत आहे. मात्र, याकडे कोणीही गांभिर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागासारख्या शासनाच्या विभागात पाट्या टाकणारांची संख्या वाढू लागली आहे. 3 मे 2024 रोजी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्ला केला. वर्षभरात राज्यातील आठ वैद्यकीय महाविद्यालयात असे हल्ले झाले आहेत. डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्यावर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षी जानेवारीमध्ये यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांवर हल्ला झाला. त्यानंतर चंद्रपूरमध्ये मे आणि सप्टेंबरमध्ये दोन वेळा हल्ले झाले. डिसेंबर 2023 मध्ये पिंपरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात, 29 जानेवारी 2024 मध्ये पुन्हा चंद्रपूरमध्ये, 4 मार्च 2024 रोजी पिंपरी वैद्यकीय महाविद्यालयात, 19 एप्रिल 2024 मध्ये अकोला येथे, 21 एप्रिल 2024 रोजी संभाजीनगर आणि 3 मे 24 रोजी अकोला वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला होता. एका वर्षात निवासी डॉक्टरांवर 9 वेळा हल्ले झाले आहेत.

अत्यावश्यक सेवा विस्कळीत करण्यासाठी कर्मचार्‍यांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमिवर शासनाने असे कृत्य करणार्‍यांविरोधात कोणकोणत्या कलमानुसार कारवाई होवू शकते. याचे फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. मात्र, असे फलक लावलेल्याच कार्यालयामधील महिला कर्मचार्‍यांवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचे कृत्य आजही भरदिवसा होत आहे. अशा घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवून त्या नराधमाविरोधात सरकार कारवाई करताना कुचराई का करत आहे, असा सवाल सामान्य जनतेला पडला आहे. कामगारांना कामगार दिनाच्या आदल्या दिवशी बारामतीमध्ये काढलेला मोर्चा बरेच काही सांगून जात आहे. त्यातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच काय पण सामान्य नागरिक सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

COMMENTS