बाळ बोठेला जामीन द्यायला रुणाल जरेंनी घेतला आक्षेप; खंडपीठात आता 15 डिसेंबरला सुनावणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळ बोठेला जामीन द्यायला रुणाल जरेंनी घेतला आक्षेप; खंडपीठात आता 15 डिसेंबरला सुनावणी

अहमदनगर/प्रतिनिधी : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष (स्व.) रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याला जामीन द्यायला रे

 नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकरी बांधवांना भरीव मदत देऊन उभारी द्या ः मा.आ.कोल्हे
मोटार वाईडींगचे दुकानातून 62 हजारांच्या साहित्याची चोरी
कर्मवीर काळे कारखान्याचे आज बॉयलर अग्निप्रदीपन

अहमदनगर/प्रतिनिधी : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष (स्व.) रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याला जामीन द्यायला रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी आक्षेप घेतला आहे. औरंगाबाद खंडपीठात त्यांनी थर्ड पार्टी हस्तक्षेप अर्ज दाखल केला असून, म्हणणे मांडण्यास मुदत मागितल्याने बोठेच्या जामीन अर्जावर आता येत्या 15 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
रेखा जरे यांच्या हत्येला एक वर्ष उलटून गेले आहे. या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे असून, घटनेनंतर तीन महिने बोठे फरार होता. त्याला अटक केल्यानंतर त्याची सुरुवातीला पोलीस कोठडीमध्ये आणि नंतर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्यामुळे आरोपी बोठे याने नगर जिल्हा न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठापुढे अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर गुरुवारी (2 डिसेंबर) सुनावणी ठेवण्यात आली होती. खंडपीठापुढे गुरुवारी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांच्यावतीने थर्ड पार्टी हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला आहे. जरे हत्यांकांडाचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने बोठे याला जामीन देऊ नये, असे या अर्जात नमूद केले असून, याबाबत सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्याची मागणी जरे यांच्यावतीने करण्यात आल्याने या प्रकरणी आता येत्या 15 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
बोठे याच्या जामीन अर्जावर 2 डिसेंबरला होणार्‍या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, रुणाल जरे यांनी मागील दोन दिवसांपूर्वीच अ‍ॅड. सचिन पटेकर यांच्या मार्फत थर्डपार्टी हस्तक्षेप अर्ज दाखल होता. त्यामुळे गुरुवारी त्यावर सुनावणी होऊन तो न्यायालयाने दाखल करून घेतला व यावर म्हणणे मांडण्यासाठी 15 डिसेंबरला सुनावणी होणार असल्याचे अ‍ॅड. पटेकर यांनी सांगितले.

COMMENTS