Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रासप स्वबळावर लोकसभा लढवणार – महादेव जानकर

मुंबई/प्रतिनिधी ः आगामी 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी आतापासून सुरु झाली असून, शिंदे गट आणि भाजप एकत्र मिळून आगामी विधानसभा आणि

पद्माकर वळवी यांची काँगे्रसला सोडचिठ्ठी
मच्छिमार रातोरात करोडपती
विरोधाची एकजूट : पर्याय आणि अडचणी !

मुंबई/प्रतिनिधी ः आगामी 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी आतापासून सुरु झाली असून, शिंदे गट आणि भाजप एकत्र मिळून आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूक लढणार असल्याचे दिसत आहे. त्यांना आम्हाला सोबत घेण्याची इच्छा दिसत नाही. त्यांना आम्हाला सोबत घ्यायचे नसेल तर हरकत नाही. आम्ही स्वबळावर लढू, अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी मांडली आहे.
रासप स्वबळावर लोकसभेच्या 48 जागा लढवेल, असे वक्तव्यही महादेव जानकर यांनी केले आहे. स्वबळावर लढण्याचा इशारा देऊन महादेव जानकर यांनी एक प्रकारे भाजपला इशारा दिल्याचे बोलले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप विधानसभेच्या 240 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. तसेच, शिंदे गटाला विधानसभेसाठी 48 जागा देणार असल्याचेही वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली असून भाजपच्या मित्र पक्षांनीही त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपने जागा वाटप जाहीर करताना आमचा विचारही केला नाही, अशी नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर भूमिका मांडताना महादेव जानकर म्हणाले, महाराष्ट्रात रासपचे आतापर्यंत चार आमदार झाले. आता आम्ही दोन आमदार आहोत. मी विधान परिषदेचा सदस्य आहे. राज्यातील 98 जिल्हा परिषदा आमच्याकडे आहेत. आसाम आणि कर्नाटकात एक जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे. गुजरातमध्ये रासपचे 28 नगरसेवक आहेत. चार राज्यात रासपला मान्यता मिळाली आहे. तरीही भाजपला आमची गरज वाटत नसेल तर आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. महादेव जानकर म्हणाले, लोकसभेत आम्ही 48 जागा लढवणार आहोत. आम्हाला सोबत घेण्याची भाजपची इच्छा नसेल तर आम्ही वेगळे लढू. जागांसाठी आम्ही भाजपच्या मागे लागायचे आणि भाजपने नाही म्हणायचे, यापेक्षा आम्ही ताकदीवर स्वतंत्र लढू. आम्ही भाजपवर अवलंबून नाही. आगामी निवडणुकांत भाजप आणि शिंदे यांची युती होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळेंनी जागा वाटप जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांची इच्छा आम्हालासोबत घेण्याची दिसत नाही. महादेव जानकर म्हणाले, जिथे नगरसेवक, जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहेत, आमदार आहेत, तेथीलच जागा आम्ही निवडणुकीसाठी मागितल्या आहेत. त्यांना आमचा प्रस्ताव मान्य नसेल आणि फक्त शिंदे गटासोबतच त्यांना जायचे असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्ही जिंकण्याच्या भूमिकेत असू तर काही ठिकाणी हरवण्याची आमची ताकद उभी करू, असा इशाराही महादेव जानकर यांनी दिला आहे.

COMMENTS