Homeताज्या बातम्या

मोटरगाडीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुंबई ः वरळी सी फेस येथे भरधाव वेगाने येणार्‍या मोटरगाडीने दिलेल्या धडकेत 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिला रविवारी पहाटे वरळी सीफेस येथे चालण

जैवविविधता जपणे हि खरी गरज-डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड; राजा राममोहन रॉय सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे प्रणेते-आनंद गायकवाड
भीम जन्मोत्सव 2023 निमित्त फुलेनगर केज येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
आतिशी यांची तब्येत खालावली

मुंबई ः वरळी सी फेस येथे भरधाव वेगाने येणार्‍या मोटरगाडीने दिलेल्या धडकेत 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिला रविवारी पहाटे वरळी सीफेस येथे चालण्यासाठी आली होती. या अपघातात गाडीचा चालकही जखमी झाला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 23 वर्षीय चालकाला अटक केली आहे. राजलक्ष्मी राजकृष्णन असे महिलेचे नाव आहे. वरळी डेअरीजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ही महिला चालत होती. त्यावेळी तेथे भरधाव वेगाने येणार्‍या मोटरगाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामळे मोटरगाडी या महिलेला धडकली. त्यानंतर गाडी तेथील दुभाजकालाही धडकली. मोटरगाडी महिलेला मागून धडकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महिला दूरवर फेकली गेली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने तिला नायर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून महिलेला मृत घोषित केले. अपघातात त्या गंभीर ज खमी झाल्या होत्या. याप्रकरणी चालकाविरोधात बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सुमेर मर्चंट (23) असे आरोपी चालकाचे नाव असून तो ताडदेव येथील रहिवासी आहे. त्यालाही अपघातात दुखापत झाली आहे.

COMMENTS