Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदी, शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली-मुंबई : देशभरातील विविध राज्यातील 93 लोकसभा मतदारसंघातील जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. या तिसर्‍या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोद

प्रवासी भारतीय देशाचे राष्ट्रदूत – पंतप्रधान मोदी
खा. शरद पवार व ठाकरेंनी एनडीएमध्ये यावे
पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली-मुंबई : देशभरातील विविध राज्यातील 93 लोकसभा मतदारसंघातील जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. या तिसर्‍या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदानांचा हक्क बजावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत अहमदाबादमधील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी यांच्यासोबत पत्नी सोनल शाह, मुलगा जय शाह आणि सून ऋषिता पटेल होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माळेगाव येथे आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची कन्या व बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्या आई प्रतिभा शरद पवार, सुळे यांचे पती सदानंद सुळे, त्यांच्या मुलांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार, आई शांताबाई अनंतराव पवार यांच्या सोबट कतेवाडी येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे कॉँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी सकाळी मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

COMMENTS