Homeताज्या बातम्याक्रीडा

रिंकू सिंहच्या शॉटने खळ्ळ खट्याक प्रचंड ताकदीनं मारलेल्या सिक्सने फोडली काच

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून दोन्ही देशांमध्ये टी-20 सिरीज खेळवली जातेय. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दुसऱ्

6 ऑक्टोंबररोजी ढाका येथे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना
हॉकीचे जादूगार, मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त “खेल उत्सव 2024” चे आयोजन
सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून दोन्ही देशांमध्ये टी-20 सिरीज खेळवली जातेय. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दुसऱ्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराश केलं. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादव आणि फलंदाज रिंकू सिंह यांच्या तुफान फलंदाजीची चर्चा होते. अशातच या सामन्यात रिंकू सिंहच्या एका शॉटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. टीम इंडियाला धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंहने दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. या खेळीमध्ये रिंकूने असा एक सिक्स लगावला ज्यामुळे मिडीया बॉक्सची काच फुटली आहे. सद्या या घटनेचा व्हिडीओचा सोशल मीडियावर व्हायरल होतोय.रिंकू सिंहचा दणदणीत सिक्स दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रिंकू सिंह पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी त्याने सुरुवातीचा काही काळ संथ गतीने फलंदाजी केली. मात्र त्यानंतर त्याने तुफान फटकेबाजी करत खरा रंग दाखवला. रिंकूने 18.4 ओव्हरमध्ये आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामच्या बॉलवर सिक्स ठोकला, त्याचा व्हिडिओही व्हायरल होतो. रिंकूने खेळलेला हा बॉल मिडीया बॉक्सवर आदळला आणि त्याची काच फुटली. त्यानंतर आता रिंकूचा हा शॉट अचानक चर्चेत आलाय. चाहत्यांनाही हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.रिंकू सिंहचं अर्धशतक या सामन्यात रिंकू सिंगने 39 बॉल्समध्ये 68 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये 9 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. यादरम्यान रिंकूने १७४.३६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणण्यास मदत केली. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना गकेबरहामध्ये खेळवला गेला. या सामन्यात साऊथ अफ्रिकेने टीम इंडियाचा धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर टीम इंडियाच्या फलंदाजांनी 19.3 ओव्हर्समध्ये 180 रन्स केले होते. मात्र, पावसामुळे साऊथ अफ्रिकेला 15 ओव्हरमध्ये 152 धावांचं आव्हान मिळालं होतं. अखेरीस 5 विकेट्स गमावत दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला.

COMMENTS