Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये चार बांगलादेशी घुसखोरांना अटक

इतर सहाजण फरार ; नाशिक एटीएस आणि नगर तालुका पोलिसांची कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी ः बांगलादेशातून विनापरवाना बनावट पासपोर्ट व अन्य बनावट कागदपत्राच्या आधारे देशात प्रवेश करून नगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खं

मनपा द्वारे नगर शहराचा पाणीपुरवठा राम भरोसे सुरू असल्याची कबुली.
नऊ वर्षाच्या मुलीवरील अत्याचारप्रकरणी दोघांना अटक
Ahmednagar : दरोडे टाकून लूटमार करणारी टोळी गजाआड (Video)

अहमदनगर/प्रतिनिधी ः बांगलादेशातून विनापरवाना बनावट पासपोर्ट व अन्य बनावट कागदपत्राच्या आधारे देशात प्रवेश करून नगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खंडाळा येथे आपली ओळख लपवून राहणार्‍या चार बांगला देशी नागरिकांना पकडले. या कारवाई दरम्यान सहाजण पसार झाले. ही कारवाई नाशिक एटीएस पोलिस आणि अहमदनगर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा एक वाजण्याच्या दरम्यान संयुक्तरित्या केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आपल्या देशात काही बांगलादेशी नागरीक बनावट पासपोर्टच्या सहाय्याने चोरुन येऊन अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खंडाळा येथे दहा बांगलादेशी नागरीक गेले काही दिवस आपली ओळख लपवून बेकायदा राहत असल्याची माहिती नाशीक येथील एटीएस पथकाला मिळाली. त्यावरुन नाशिक एटीएस आणि अहमदनगर पोलिसांनी खंडाळा येथील क्रेशरवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी मोहीनूद्दीन नाजीम शेख, शहाबुद्दीन जहागिर खान, दिलावर खान सीराज ऊल्लह खान,  शहापरान जहागिर खान, या चार आरोपींना अटक केली. असून सहाजण फरार झाले आहे. पोलिसांनी अटक आरोपीकडून बनावट पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला असे कागदपत्र हस्तगत केले. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात मोहीनूद्दीन नाजीम शेख, शहाबुद्दीन जहागिर खान, दिलावर खान सीराज ऊल्लह खान,  शहापरान जहागिर खान, या चौघांविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 420, 465, 467, 468, 471 तसेच भारतामध्ये प्रवेश 3 (अ) 6 (अ) 14 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पसार झालेल्या सहा जणांचा शोध घेत होते.तसेच त्यांच्या शिवाय आणखी कितीजण यात सामील आहे की काय याचा शोध घेत आहेत.

COMMENTS