Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डंपर-दुचाकी अपघातात युवतीचा मृत्यू

फलटण / प्रतिनिधी : तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच असुन फलटण शहरातील पुणे-पंढरपुर रोड लगत नाना पाटील चौकालगत फुले गॅरेज समोर डंपर व दुचाकीच्या अप

सर्वांना सोबत घेऊन हद्दवाढ करणारच : आ. चंद्रकांत जाधव
शिवप्रेमी प्रेक्षकांनी अनुभवला शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातील थरार
शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करुन कोरोना प्रतिबंधक साधनसुविधा पुरविण्याची शिक्षक परिषदेची मागणी

फलटण / प्रतिनिधी : तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच असुन फलटण शहरातील पुणे-पंढरपुर रोड लगत नाना पाटील चौकालगत फुले गॅरेज समोर डंपर व दुचाकीच्या अपघातात एका 22 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवार, दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास पुणे-फलटण रोडवर नाना पाटील चौकालगत फुले गॅरेज समोर डंपर जात असताना दुचाकीस पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील काजल धनंजय कुतवळ (रा. चौधरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) ही गंभीर जखमी झाली. काजल हिला फलटण शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यावेळी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी काजल हिस मृत घोषीत केले.
शहर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत या अपघाताबाबत माहिती दिली नाही. याबाबत सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या गुन्ह्याचा अधिक तपास करणारे पोलीस कर्मचार्‍यांनी सविस्तपणे माहिती दिली नाही. अपघातावेळी याठिकाणी उपस्थीत असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांनी अपघातातील डंपर चालक यास अटक केली नाही, अशी माहिती घटनास्थळी उपस्थीत असणार्‍या नागरिकांनी दिली. सायंकाळी उशिरापर्यंत चालकास अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळत असून पोलीस डंपर चालकास अटक करण्याबाबत व सविस्तपणे माहिती देण्याचे टाळत असल्याने पोलीस कर्मचार्‍यांच्या कामाबाबत फलटण तालुक्यात याबाबत उलत सुलट चर्चा सुरू होती.

COMMENTS