मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका : नरेंद्र पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका : नरेंद्र पाटील

सोलापूर : आता यापुढे मराठा आक्रोश मोर्चा काढतांना तारीख देणार नाही, थेट अ‍ॅटॅक करू. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, त्यांना नक्षलवादी होऊ देऊ

वीज पडून होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी “या” करा उपाययोजना
अमृतवाहिनी ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
आठवडे बाजारातील दुकानदार व ग्राहकांना मोफत पाण्याची सोय ः काका कोयटे

सोलापूर : आता यापुढे मराठा आक्रोश मोर्चा काढतांना तारीख देणार नाही, थेट अ‍ॅटॅक करू. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, त्यांना नक्षलवादी होऊ देऊ नका, असे आवाहन मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक नरेंद्र पाटील यांनी सरकारला केले आहे.
संचारबंदीचे आदेश झुगारून हजारो मराठा तरुणांनी या मोर्चात भाग घेतला. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ आणि ‘कोण म्हणतं देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’, अशा गगनभेदी घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या मोर्चात हजारो तरुण सहभागी झाल्याने पोलीस यंत्रणांचेही धाबे दणाणले. त्यामुळे पोलिसांनी अनेकांची धरपकड केल्याने आंदोलक प्रचंड संतप्त झाले होते. मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आक्रोश मोर्चाची हाक दिली होती. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यासाठी संचारबंदी लागू असल्याचं आणि कोरोनाचं कारणही देण्यात आलं होतं. मात्र, संचारबंदीचे आदेश झुगारून पाटील यांनी मोर्चा काढला. संभाजी चौकात सकाळीच आंदोलक जमू लागले. त्यानंतर दुपारी ही गर्दी प्रचंड वाढल्याने आंदोलकांच्या घोषणाही दणाणू लागल्या. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना सोलापूरच्या वेशीवर अडवले. काहींची धरपकड केली. त्यामुळे नरेंद्र पाटीलही संतप्त झाले होते. दुपारी या मोर्चात प्रचंड गर्दी झाली. यावेळी पाटील थेट गर्दीत गेले. त्यांनी आंदोलकांना संबोधित करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अचानक मोर्चात ढकलाढकली सुरू झाली. गर्दी प्रचंड होती. पोलिसांनी नाकाबंदी केल्यामुळे अनेकांची अडचण झाली. टेंभुर्णी येथे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपा नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा विरोध करीत रस्ता रोको केला.

दोन खासदार, आठ आमदारांची उपस्थिती
यावेळी माढाचे माजी खासदार रणजित नाईक-निंबाळकर उपस्थित होते. या मोर्चाला आठ आमदार आणि दोन खासदार उपस्थित होते. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनीही मोर्चात भाग घेतला. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर मराठा आरक्षण मोर्चा काढला जात आहे. त्यामुळे सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.

COMMENTS