Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतम बँकेच्या उपाध्यक्षपदी रक्ताटे

कोपरगाव : सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता असलेल्या आणि दर्जेदार सेवा देण्यात अग्रभागी असणाऱ्या गौतम सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी विजय यादवराव रक्ताटे

इज्तेमाच्या मंडप उभारणीचा माजी आ.अशोकराव काळेंच्या हस्ते प्रारंभ
Ahmednagar : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ Kopargaon शहरात सायकल रैली
कोपरगाव शहराच्या विकासाला नवी दिशा

कोपरगाव : सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता असलेल्या आणि दर्जेदार सेवा देण्यात अग्रभागी असणाऱ्या गौतम सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी विजय यादवराव रक्ताटे यांची निवड करण्यात आली. विद्यमान उपाध्यक्ष सुनील डोंगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर विजय यादवराव रक्ताटे यांची निवड करण्यात आली.

नुकतेच अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंध सहकारी संस्था एस.पी.रुद्राक्ष कोपरगाव यांच्या उपस्थितीत गौतम सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी विजय यादवराव रक्ताटे यांच्या नावाची सूचना जेष्ठ संचालक बाबुराव थोरात यांनी मांडली. सदर सूचनेस मावळते उपाध्यक्ष डोंगरे यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी निवडणूक अधिकारी एस. पी. रुद्राक्ष तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव यांनी रक्ताटे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

माजी आ.अशोकराव काळे व काळे कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बँकेचे चेअरमन संजय आगवण, मावळते व्हा.चेअरमन सुनील डोंगरे व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी व्हा.चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल विजय रक्ताटे म्हणाले की, मी शेतकरी कुटुंबातून असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा, शेतकऱ्यांचे प्रश्न यांची जाणीव आहे. बँकेच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी, युवक व सर्वसामान्य सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे.

यावेळी बँकेचे चेअरमन संजय आगवण, मावळते व्हा.चेअरमन सुनील डोंगरे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत तिरसे, संचालक राजेंद्र ढोमसे, बाबुराव थोरात, कमलाकर चांदगुडे, बापूसाहेब वक्ते, तुकाराम हूळेकर, उत्तम भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS