Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक प्रभावित

इगतपुरी : कसारा जवळ रेल्वेच्या रुळाखाली असलेली खडी धसल्यामुळे रेल्वे वाहतुकी वरती मोठा परिणाम झाला असून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ही उशिराने

थोरात कारखान्याकडून 10 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
शाहू महाराजांना विशालगडावर जाण्यापासून रोखले
अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी द्या – खासदार डॉ. अमोल कोल्हे

इगतपुरी : कसारा जवळ रेल्वेच्या रुळाखाली असलेली खडी धसल्यामुळे रेल्वे वाहतुकी वरती मोठा परिणाम झाला असून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ही उशिराने धावत आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. प्रशासनाच्या वतीने तातडीने या ठिकाणी काम सुरू केले आहे. मध्ये रेल्वेच्या अप मार्गावर कसारा ते उंबरमाळी स्थानका दरम्यान  रेल्वे रूळाखालील खडी धसली आहे. यामुळे रेल्वे रुळांची उंची कमी जास्त झाली. म्हणून कसाराहून मुंबई सीएसटी मार्गाकडे जाणारी रेल्वे वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरी, घोटी, लहावीत रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. हा खड्डा भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. यामुळे अप मार्गाची वाहतूक एक तास उशिराने सुरू असून लोकल धिम्यागतीने सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

COMMENTS