Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे ;- आमदार मोनिका राजळे 

पाथर्डी प्रतिनिधी - शालेय विद्यार्थ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने व मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे. परिक्षा देतांना कॉपी

संगमनेर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी 3 कोटीचा निधी मंजूर
समताच्या सेल्फ बँकिंग विड्रॉल सुविधेचा शुभारंभ
महिलेचा पाठलाग करून गैरवर्तन, गुन्हा दाखल

पाथर्डी प्रतिनिधी – शालेय विद्यार्थ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने व मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे. परिक्षा देतांना कॉपी करण्याची गरज नसुन तुम्ही जे काही कराल ते मोठ्या आत्मविश्वासाने करत रहा. त्यामुळे तुम्ही आनंदी वातावरणात परीक्षा देऊ शकाल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत बनण्यास मदत होईल याची मला खात्री आहे असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील परिक्षे पे चर्चा उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आमदार मोनिका राजळे व पाथर्डी तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने दादापाटील राजळे महाविद्यालय कासार पिंपळगाव, हरिहरेश्वर महाविद्यालय कोरडगाव,श्री विवेकानंद विद्यालय पाथर्ड , कनिफनाथ विद्यालय जवखेडे खालसा, हुतात्मा बाबु गेणु संस्था पाथर्डी, शिवतेज विद्यालय मढी, रामराव फुंदे माध्यमिक विद्यालय तनपुरवाडी या केंद्रावर आयोजीत करण्यात आल्या होत्या. तालुक्यातील सुमारे तीन हजारापेक्षा जास्त विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते.यानंतर दादापाटील राजळे महाविद्यालयातील माजी आमदार स्व.राजीव राजळे क्रीडा संकुलात झालेल्या बक्षीस वितरण प्रसंगी आमदार राजळे बोलत होत्या.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, सरचिटणीस जे.बी.वांढेकर, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कुशल भापसे,जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे, माजी उपनगराध्यक्ष बजरंग घोड़के, नामदेव लबडे, रमेश हंडाळ, महादेव जायभाये, प्रा. विक्रम राजळे, प्रा.शाम गरड, चारूदत्त वाघ, श्रीकांत मिसाळ, अड वैभव आंधळे, नारायण पालवे, नवनाथ नरोटे, निलेश काजळे, संजय पालवे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी ,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी दहा ते अकरा या वेळेत संपन्न झालेल्या स्पर्धेनंतर आमदार मोनिका राजळे व मान्यवरांच्या उपस्थितीत सम्मान चिन्ह व बक्षीस वितरण करण्यात आले. चित्रकला स्पर्धेसाठी जी ट्वेंटी जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टिने वाटचाल, आझादी का आमृत महोत्सव, सर्जीकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणात भारत एक नंबर, पंतप्रधान जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्म निर्भर भारत, आंतरराष्ट्रिय  योगदिन मो दींन वेधले जगाचे लक्ष ,बेटी बचाव बेटी पढाव, चुलीतल्या धुराच्या त्रासातुन महिला मुक्त मोदींचा संवेदनशील निर्णय आदि विषय देण्यात आले होते. यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी रंगविलेली चित्रे पाहात गप्पा करत विचारपुस करून मार्गदर्शन केले.

         कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य राजधर टेमकर, सुत्रसंचालन प्रा.राजेंद्र इंगळे यांनी तर आभार युवा मोर्चाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष सचिन वायकर यांनी मानले.

COMMENTS