सकारात्मक दृष्टिकोनाने यशाची उंची गाठता येते – न्यायाधीश रेवती बागडे 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सकारात्मक दृष्टिकोनाने यशाची उंची गाठता येते – न्यायाधीश रेवती बागडे 

पाथर्डी प्रतिनिधी - विद्यार्थी घडविण्याचे काम पालकांबरोबर शिक्षक करतात.विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश प्

सोमैयाच्या अक्षय आव्हाडची ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड
राहुरीत अक्षता मंगल कलशाचे जल्लोषात स्वागत
कोपरगाव शहरात महिलेची आत्महत्या, तीन आरोपींवर गुन्हा

पाथर्डी प्रतिनिधी – विद्यार्थी घडविण्याचे काम पालकांबरोबर शिक्षक करतात.विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश प्राप्त करता येते. विद्यार्थ्यांच्या जीवनाला ज्ञानासह शालेय स्तरावर लागलेल्या शिस्तीतून आपले जीवन समृद्ध करता येते यामध्ये शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा असतो.शालेय जीवनातील दहावीची परीक्षा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचे पाऊल असते.जीवनाची खरी परीक्षा येथेच सुरू होते प्रत्येक विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार केल्यास प्रत्येकाला यशाची उंची गाठता येते असे विचार न्यायाधीश रेवती बागडे यांनी व्यक्त केले.पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित, श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी या विद्यालयाचा इयत्ता दहावी विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रम नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण  झालेल्या न्यायाधीश रेवती बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

          विद्यार्थी निरोप कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड,उपाध्यक्ष अड सुरेशराव आव्हाड, न्यायाधीश रेवती बागडे, प्रशांत बागडे,मुख्याध्यापक शरद मेढे,समन्वयक ज्ञानेश्वर गायके, पर्यवेक्षक संपत घारे, अर्चना दराडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले, की शालेय अभ्यासक्रमाबरोबर आपले आरोग्य आणि शिस्त यांची सांगड घालत परीक्षेस सामोरे जावे. प्रत्येकाने चांगले ध्येय ठेवून ते ध्येय गाठण्यासाठी प्रचंड परिश्रम करावेत व आपल्या आई-वडिलांचे, शाळेचे नाव उज्वल करावे तसेच सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यापुढेही विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीची गरज भासल्यास संस्था व शाळा संपूर्ण सहकार्य करेल असे विचार व्यक्त केले.

        यावेळी सार्थक देशमुख,दीक्षा पंडागळे, ऋषिकेश पाचरणे, स्नेहल खेडकर, कल्याणी शिरसाट, कृष्णा वाघ, रोहन डांगे या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच यावेळी मुख्याध्यापक शरद मेढे, संपत घारे व अर्चना दराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके यांनी तर सूत्रसंचालन कल्याणी गर्कळ, शिवानी गायकवाड यांनी केले तर अभिजीत सरोदे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप धायतडक, रेश्मा सातपुते, संदीप आव्हाड, तुषार शिंदे, स्नेहल बोराडे, दीपक राठोड,सोनिका वखरे, महेंद्र तांदळे,प्रमोद हंडाळ, कैलास भोसले, बाळू हंडाळ यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS