Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा गांधी व्यक्ती नसून एक विचार ः प्राचार्य बनकर

सर्वोदय विद्यालयात बापू आणि लाल बहादूर शास्त्रींना अभिवादन

अकोले/प्रतिनिधी ः  अन्यायाशिवाय क्रांती होत नाही. या क्रांतीमधूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लाल बहादुर शास्त्री जन्माले आले. सर्व मार्ग संपत

 शहरटाकळी येथे बंद व रास्ता रोको
वरशिंदेच्या उपसरपंचावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा
निवारा बालगृह समाजाला दिशा देणारे ठिकाण ः आमदार सुरेश धस

अकोले/प्रतिनिधी ः  अन्यायाशिवाय क्रांती होत नाही. या क्रांतीमधूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लाल बहादुर शास्त्री जन्माले आले. सर्व मार्ग संपतात तेव्हा महात्मा गांधी योग्य मार्ग दाखविणारे राष्ट्रपिता होते, म्हणूनच महात्मा गांधी व्यक्ती नाही तर एक विचार होते, असे प्रतिपादन प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी केले.
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथे महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी प्राचार्य बनकर विचारमंच्यावरून बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक विजय पवार, विदयालयाचे उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृहाचे कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी पुढे बोलताना आपण भाग्यशाली समजले पाहीजे, सत्यनिकेतन संस्थेचा संबंध थेट महात्मा गांधींजींशी आला. ही विचारधारा बापुसाहेब शेंडे, सावित्रिबाई मदन, रा.वि.पाटणकर यांनी सत्यनिकेतन परिवारात कायम ठेवली. खेड्याकडे चला हा संदेश देत दिनदलित,उपेक्षित,शेतकरी,शिक्षक यांचे ते मार्गदर्शक ठरले. म्हणूनच आजही या विचार आचारांची गरज असल्याचे विचार प्रतिपादित केले.
दीपक पाचपुते यांनी, महात्मा गांधींचे नाव घेतल्याशिवाय कोणतेच कार्य पूर्ण होत नाही.गांधीजींचे विचार संपूर्ण जगाला कळाले.त्यासाठी गांधींजीचे चरित्र वाचले पाहीजे. त्यांचे विचार शाश्‍वत व सर्वव्यापी आहेत. प्रा.संतराम बारवकर व प्रा.बाळासाहेब घिगे, पुंजिराम पवार यांनी सुरबद्ध सर्वधर्म प्रार्थना गायनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. श्रीकांत घाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS