देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांना नगर येथे नगर -मनमाड महामार्गावर अज्ञात चोरट्यांनी अडवून त्यांच्य

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांना नगर येथे नगर -मनमाड महामार्गावर अज्ञात चोरट्यांनी अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच मोबाईल चोरून मारहाण केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेच्या निषेधार्थ राहुरी येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले असून आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर आरोपी देखील निष्पन्न केले असून लवकरात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले.
वांबोरी येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांचा पाईप लाईन रोड लगत असलेल्या तुळजा भवानी मंदिरा जवळ अपघात झाला.कांबळे यांना तेथे उपस्थित असलेल्या तिघांनी उपचारासाठी नेत असताना कांकरीया शोरुम जवळ नेवून कांबळे यांच्या खिशातील 13 हजार रुपये रोख व मोबाईल काढुन घेवून बेदम मारहाण केली.तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.परंतू पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत नसल्याने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पञकारांच्या वतीने या घटनेचा निषेध करुन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देवून आरोपींचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली. सदर निवेदनावर ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी, तालुकाध्यक्ष रफिक शेख, अहमदनगर पञकार हल्ला कृती समितीचे समन्वयक राजेंद्र उंडे, तालुकाउपाध्यक्ष गोविंद फुणगे, श्रीकांत जाधव, अनिल कोळसे, रियाज देशमुख, ऋषिकेश राऊत, आकाश येवले, महेश कासार, प्रभाकर मकासरे, नानासाहेब उंडे, राजेंद्र परदेशी, मनोज साळवे, समीर शेख, युनूस शेख, शरद पाचारणे, मनोज साळवे, प्रसाद मैड, सुनिल रासने,लक्ष्मण पटारे आदि पत्रकाराच्या सह्या आहेत.
COMMENTS