तणनाशकामुळे गावरान भाज्या झाल्या दुर्मिळ

Homeमहाराष्ट्रबीड

तणनाशकामुळे गावरान भाज्या झाल्या दुर्मिळ

माजलगांव/प्रतिनिधी : तणनाशक फवारणी मुळे गावरान भाज्या लुप्त झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . भविष्यात मानवाच्या शरीरातील रोग प्रतिरोधक शक्ती कमी होत

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी एस.एम.युसूफ़ यांची नियुक्ती
Beed : बनावट दारूच्या गोदामावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त (Video)
Beed : जिल्हाधिकाऱ्यांनी केला चक्क ट्रॅक्टर मधून प्रवास……

माजलगांव/प्रतिनिधी : तणनाशक फवारणी मुळे गावरान भाज्या लुप्त झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . भविष्यात मानवाच्या शरीरातील रोग प्रतिरोधक शक्ती कमी होत आहे.
मृग नक्षत्राचा पाऊस पडला की शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी कामाला लागतो . खरिपाच्या पिकासोबत अनेक पालेभाज्या व पीकमारक तणशेतात मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात यामध्ये राजगिराची भाजी,आळूची भाजी चिगळची भाजी तांदूळकुंद्राची भाजी, आघाडीची भाजी, अंबाडी, खापरकुट्टीची भाजी , कपाळपुडी भाजी कवठाची भाजी, उंबर, आळूची भाजी, कुडूंची भाजी, अशा पंचवीस प्रकारच्या भाज्या व शेतकऱ्यांनी शोधून काढल्या आहेत. त्यातील अनेक वनस्पती खाण्यासाठी योग्य असतात . त्यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या पद्धतीने वाढते . या वनस्पतीचा वापर जनावरांच्या रोगांचा नायनाट करण्याचे कामही करते. सुमारे १४ वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला, ताप आदींवर औषधी म्हणून तर काही वनस्पती गर्भवती महिला व बालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत. पूर्वी सेंद्रिय शेती हा शेतीचा मुख्य गाभा होता. त्यामुळे मानवाची आयुमर्यादा ही चांगली होती. पूर्वी माणूस शंभर वर्षांपर्यंत जगायचा. सध्या मात्र संकरित शेती आणि उत्पादन जास्त ही मानसिकता सर्वांची झाली आहे. उत्पादन वाढले की पैसा हमखास मिळतो अशी पद्धत असल्याने निश्चितच मानवी शरीरावर याचा परिणाम झाला असल्याचे गंगामसला येथील ज्येष्ठ शेतकरी परशुराम सोळंके यांनी दैनिक लोकमंथची बोलाताना खंत व्यक्त केली आहे.
खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात या वनस्पती भाज्या यायच्या त्या आम्ही खायचं त्यामुळे आमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे. घरात दूध, तूप, लोणी याचा वापर होता ते आम्ही रोज आहारात खात असल्याने आजही आम्ही तंदुरुस्त आहोत असे गंगामसला येथील ज्येष्ठ शेतकरी परशुराम सोळंके यांनी सांगितले. सध्या शेती करण्याची परिस्थिती बदलल्यामुळे व शेतात मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरीपेरणी सोबतच तणनाशक औषधाची फवारणी करतात . यामुळे गावरान भाज्या लुप्त होत असल्याने भविष्यात या भाज्यांचे नावे फक्त पुस्तकातील चित्रात दिसतील अशी चिंता शेतकरी सुंदर लोमटे यांनी व्यक्त केले . दरम्यान , काही जणांना याची जाणीव झाल्याने त्यांच्याकडून या भाज्यांची जोपासना करण्याचे प्रयत्न होत असले तरी त्यावर मर्यादा येत आहे.

COMMENTS