Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा, जामीन मंजूर

सूरत : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना गुजरातच्या सूरत येथील कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. राहुल गांधी यंनी 2019 च्या लोकसभा निवडणुक

२०२४ ला दिपक केसरकरांनीच जेल मध्ये जायची तयारी ठेवावी सगळं तयार आहे – संजय राऊत
राष्ट्रगीत म्हणत असताना दहावीच्या मुलीला आला हृदयविकाराचा झटका
कळंबी येथे विजेच्या तारा येतायत हाताला; शेतकर्‍यांचे जीव मुठीत घेऊन कामकाज; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

सूरत : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना गुजरातच्या सूरत येथील कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. राहुल गांधी यंनी 2019 च्या लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान मोदी आडनावावरून टीका केली होती. याप्रकरणी दाखल केलेल्या खटल्यात राहुल यांना दोषी मानून कोर्टाने ही शिक्षा सुनावली. दरम्यान याप्रकरणी राहुल यांना तत्काळ जामीन मंजूर करण्यात आला.
राहुल गांधीनी 2019 मध्ये कर्नाटक येथे प्रचारादरम्यान मोदी आडनावावरून टीका केला होती. कर्नाटच्या कोलार येथे आयोजित सभेत सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे ? असा प्रश्‍न राहुल यांनी विचारला होता. याविरोधात गुजरातमधील भाजपाचे नेते पुरनेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. गेल्या आठवड्यात याप्रकरणी सुनावणी पार पडली होती. त्यानंतर गुरुवारी राहुल यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला. राहुल गांधीचा जामीन मंजूर झाला आहे. मात्र या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या शिक्षे विरोधात वरिष्ठ न्यायालयात अपिल करण्यासाठी 30 दिवसांचा वेळ देण्यात आला.

COMMENTS