Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आहारावर वाद करणाऱ्यांचे मनसुबे काय !

आहार, आचार, विचार, संचार याचं स्वातंत्र्य भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला देते. त्यातले विचार आणि संचार स्वातंत्र्य हे सार्वजनिक जीवनात स्पष्ट

युती आणि आघाडीची इतिश्री ! 
हा सांस्कृतिक गुन्हाच ! 
रस्त्यावरचा अपघात !

आहार, आचार, विचार, संचार याचं स्वातंत्र्य भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला देते. त्यातले विचार आणि संचार स्वातंत्र्य हे सार्वजनिक जीवनात स्पष्ट दिसतात; तर, आचरण हा व्यक्तीवरचा संस्कार दर्शवतो. परंतु, यातील आहार ही जिवनाची वैयक्तिक बाब असते. संविधान जे स्वातंत्र्य देते ते कोणालाही हिरावून घेण्याचा अधिकार नाही. गेल्या काही वर्षांपासून मात्र कोणाच्या घरात काय आहार होतोय आणि त्यासाठी थेट माॅब लिंचिंग केल्याची घटना अखलाक या उत्तर प्रदेशातील व्यक्तीच्या संदर्भात घडते. आता काहीसा तसाच प्रकार महाराष्ट्रात होतोय; परंतु, तो शाब्दिक मर्यादांवर घडतोय एवढेच! महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक वजनदार नेते असणारे शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मटन खाऊन देवदर्शन केल्याचा एकच बोभाटा केला जातो आहे.

जे महाभाग हा बोभाटा करताहेत त्यांना तसा अधिकार कोणी दिला. जर भारतीय संविधान नागारिकाला आहार स्वातंत्र्य प्रदान करित असेल तर ते बाजूला सारून असे कोण आहेत की, ज्यांनी सुप्रियाताई सुळे यांच्या जेवणाचे पदार्थ काय होते, हे सार्वजनिक करायची सुपारी घेतलीय. सुप्रियाताई सुळे यांच्या राजकारणाविषयी आमचेही मतभेद आहेत आणि असू शकतात. परंतु, त्यांच्याशी राजकीय मतभेद असणे म्हणजे त्यांच्या आहाराचा विषय सार्वजनिक करणे, यास मान्यता देणे हेच मुळात अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. मटन खाऊ नये, हा कायदा नव्हे; तर एक रूढी किंवा परंपरा मात्र आहेत. तसे पाहिले तर बहुजनांच्या अनेक देवतांना मांसाहार चालतो. नवसायास तर कोबंड-बकरं बळी देऊन प्रसाद म्हणून त्यांच शिजवलेलं मांस प्रसाद म्हणून खाणं ही या देशातील लोकप्रिय परंपरा आहे. त्यामुळे, मटन खाऊन देव कोपतो असे दिसत नाही. एकमात्र यासंदर्भात सांगता येईल की, समतेची संत परंपरा ही निश्चितपणे शाकाहार जोपासणारी आहे. पंढरपूर च्या विठोबा-रूखमाई’चे दर्शनासाठी येणारा वारकरी हा सात्विक किंवा शाकाहारच घेतो. एकदा का त्याने वारकऱ्याची माळ घातली तर आजीवन शाकाहारी बनतो. परंतु, तो कधीही त्याच्या आहाराविषयी सार्वजनिक ठिकाणी चर्चाही करित नाही आणि त्यासाठी कोण्या मांसाहारी असणाऱ्या व्यक्तींचा द्वेषही करित नाही. परंतु, आहारावरून मटन खाऊन देवदर्शन घेतल्याचा बोभाटा करणारी मंडळी ही बेमालूमपणे विषमतेची पुरस्कर्ती असल्याचे दिसते.

सुप्रियाताई सुळे यांनी मटन खाऊन देवदर्शन केले असेल तर त्याचे सार्वजनिकीकरण करण्यात कोणाचा फायदा आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला तर, ही बाब प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे ब्राह्मण – ब्राह्मणेतर असा भेद उभा करणारी आहे. मुंबई – पुणे सारख्या महानगरात ब्राह्मणेतर हिंदूंना उच्च जातीयांच्या वसाहतीत घरे मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक, ” तुम्ही व्हेज की नाॅनव्हेज? असा निर्लज्ज प्रश्न हमखास केला जातो. या प्रश्नात स्वधर्मिय लोकांना त्या वसाहतीत भाड्याने किंवा खरेदी तत्वावर घरे नाकारली जातात, ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे मटन खाऊन देवदर्शनाचा बोभाटा करणाऱ्यांची मानसिकता अशा जातीय अंगाने असल्यामुळे ती निंदनीय आहे.
     आपण पाहिले आहे की, अवघ्या वर्षभरापूर्वी जगावर कोरोनाचं संकट असताना जगातील सर्व नागरिकांना मांसाहार अधिक प्रमाणात करण्याची शिफारस केली गेली. या शिफारसी चे ज्यांनी पालन केले, त्यांची प्रतिकार शक्ती मजबूत होऊन त्यांचे कोरोनापासून संरक्षण झाल्याची ताजी माहिती आपल्या सर्वांकडे आहेच! माणूस हा स्वातंत्र्यप्रिय प्राणी आहे. त्याची स्वतंत्रता आहार, विहार, संचार च्या बाबतीत कोणालाही हिरावून घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे, सुप्रियाताई सुळे यांच्या आहाराचे राजकारण करणारे हे कोणत्या संस्कृतीचे वाहक आहेत, हे त्यांनी आधी स्पष्ट करावं!

COMMENTS