मुंबईत जाऊन ओढणार अंगावर आसूड…; पोतराज संघटना झाली आक्रमक, कार्यक्रमांना परवानगीची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत जाऊन ओढणार अंगावर आसूड…; पोतराज संघटना झाली आक्रमक, कार्यक्रमांना परवानगीची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी- पोतराज, जोगती, वाघे- मुरळी, आराधी कलावंतांचा आवाज शासनापर्यंत पोहोचत नसेल तर आगामी काळात विधान भवनासमोर राज्यातील समस्त पोतराजांसम

पंचनामा नको नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या- शीला खेडकर
पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत 15 रोजी जिल्हा मेळावा
बुलडाण्यात टिप्पर उलटून 13 मजुरांचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*

अहमदनगर/प्रतिनिधी- पोतराज, जोगती, वाघे- मुरळी, आराधी कलावंतांचा आवाज शासनापर्यंत पोहोचत नसेल तर आगामी काळात विधान भवनासमोर राज्यातील समस्त पोतराजांसमवेत येऊन अंगावर आसूड ओढून घेऊ, असा इशारा महाराष्ट्र पोतराज संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब उडाणशिवे यांनी दिला आहे. कोरोना निर्बंधांमुळे सार्वजनिक उत्सव तसेच विवाह समारंभांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे या समारंभांतून लोककला सादर करून उदरनिर्वाह करणार्‍या लोककलावंतांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यांना जगणे मुश्किल झाल्याने तसेच कोरोना निर्बंध शिथील होण्याची चिन्हे दिसत नसल्याने शहरातील लोककलावंतांनी येथील हुतात्मा स्मारकावर जाऊन आदरांजली व्यक्त केली व कोरोना निर्बंध शिथील झाले नाही तर मुंबईत जाऊन राज्यभरातील पोतराजांसह विधान भवनासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
एक पात्री किंवा दोन-तीन कलाकारांच्या मदतीने नागरी सोसायट्यांच्या आवारात सादर होणार्‍या कलांना तात्काळ परवानगी मिळावी, फी न भरल्यामुळे रंगकर्मींच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले असून संबंधित संस्था चालकांशी बोलून हा प्रश्‍न निकाली काढावा, या व्यतिरिक्त दीड वर्षात कमाई नसल्याने घर भाडे, वीज बिल भरण्यात अडचणी येत असल्याने संबंधित आस्थापनांनी रंगकर्मींना यात सवलत द्यावी, महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींसाठी रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी, महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत दरमहा पाच हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळावा, महाराष्ट्रातील विखुरलेल्या या रंगकर्मींची शासन दरबारी नोंद व्हावी, कलाकार पेन्शन योजनेच्या लाभासाठी अटींमध्ये शिथिलता आणावी, मानधनाच्या आकड्यात वाढ करावी, रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी, या व अन्य मागण्यांचे निवेदन शासन दरबारी देण्यात आले आहे. शासनास जाग आणण्यासाठी हुतात्मा स्मारकात वाजंत्री व पोतराजांसह आपली कला सादर करीत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात उडाणशिवे यांच्यासह अभिनेते प्रशांत नेटके, पोतराज मछिंद्र शेलार, सुनील चांदणे, विशाल वैरागर,अमित गाडे, सुभद्राबाई उल्हारे, मोहन गाडे, अमोल शेरकर आदी सहभागी झाले होते.

लढा कलावंतांसाठी
लोककलावंत व चित्रपट कलावंतांच्या मागण्यांचे निवेदन शासनाकडे पोहोच झाले असून, या निदर्शनाच्या माध्यमातून शासनाला मागण्यांचे स्मरण करून देत आहोत. हा लढा वैयक्तिक नसून समस्त कलावंत बांधवांसाठी आहे, असे यावेळी कलावंतांद्वारे सांगण्यात आले.

COMMENTS