Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाळ्यात अतिवृष्टीने निर्माण होणार्‍या पुरग्रस्त भागाची पहाणी

शिराळा / प्रतिनिधी : सागांव (ता. शराळा) येथे प्रतिवर्षी पूरबाधित होणार्‍या क्षेत्रांची तहसिलदार शामला पाटील-खोत यांनी पाहणी करून लवकरच लोकप्रति

सातार्‍यात ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ उभारणार : श्री. छ. वृषालीराजे भोसले
त्रिपुडी येथील सोन्या नावाच्या चंद्रकोर बोकडाला 23 लाखाची बोली
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती; राज्य निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय

शिराळा / प्रतिनिधी : सागांव (ता. शराळा) येथे प्रतिवर्षी पूरबाधित होणार्‍या क्षेत्रांची तहसिलदार शामला पाटील-खोत यांनी पाहणी करून लवकरच लोकप्रतिनिधी आ. मानसिंगराव नाईक यांची भेट घेऊन, चर्चा करून याबाबत पूरग्रस्त लोकांना शासनस्तरावरुन सहकार्य करण्याबाबत काही उपाययोजना करता येतील का? याबाबत आश्‍वासन दिले.
शिराळा येथे नुकत्याच काही दिवसांपूर्वी नूतन तहसिलदार म्हणून शामला पाटील खोत यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी प्रथमच पदभार स्वीकारल्यापासून सांगावला भेट दिली. याबाबत त्यांनी सागांवमध्ये पावसाळ्यात अतिवृष्ठीने निर्माण होणार्‍या पुरग्रस्त भागाची पहाणी केली. दरम्यान, ग्रा. पं. सदस्य शशिकांत पाटील, संग्राम पवार, विश्‍वासचे संचालक बाबासो पाटील यांनी तहसिलदार शामला पाटील खोत यांनी पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती दिली. दरम्यानच्या कालावधीत पूरबाधीत लोकांची होणारी दयनीय अवस्था याविषयीही विस्तृत माहिती सांगितली. वारंवार प्लॉट मिळण्या संदर्भात या पूरबाधित लोकांनी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नांची माहितीही सदस्य संग्राम पवार यांनी दिली. परंतु शासन स्तरावरुन या पूरबाधित लोकांना म्हणावा असा प्लॉट संदर्भात प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही काहींनी व्यक्त केली. तसेच तहसिलदार खोत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आपत्कालीन परिस्थितीत लोकांना राहण्याची सोय शाळेतील हॉलमध्ये केली जाते. त्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

COMMENTS