Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिराळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती-उपसभापती बिनविरोध

शिराळा / प्रतिनिधी : शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी पोपट चरापले तर उपसभापती पदी विजय महाडिक यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही जगा

महाविकास आघाडीची विकास पताका घेऊन धावल्या कोयना-महाराष्ट्र एक्सप्रेस
वन्यप्राणी-मानवी संघर्ष टळण्यासाठी 664 पाणवठ्यांची निर्मिती
पावसाळ्यात जीवित व वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी : ना. बाळासाहेब पाटील

शिराळा / प्रतिनिधी : शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी पोपट चरापले तर उपसभापती पदी विजय महाडिक यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही जगासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडी बिनविरोध झाल्या. सभापतीपदी पोपट जयसिंग चरापले तसेच उपसभापतीपदी विजय बाबूराव महाडिक यांची निवड झाली.
नूतन सभापती, उपसभापतींचा सत्कार माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आ. मानसिंगराव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. पारदर्शक कारभार करून बाजार समितीस नावलौकिक मिळून द्यावा, अशी अपेक्षा यावेळी आ. नाईक यांनी व्यक्त केली. सभापती पदासाठी पोपट चरापले यांचा व उपसभापती पदासाठी विजय महाडिक यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक डी. एस. खताळ यांनी सभापती पदासाठी पोपट चरापले यांची व उपसभापती पदासाठी विजय महाडिक यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक निर्णय अधिकारी डी. एस. खताळ यांच्या हस्ते नूतन सभापती व उपसभापती तसेच त्यांनी यावेळी मावळते सभापती सुजय देशमुख व उपसभापती सुरेश पाटील यांचाही सत्कार केला.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, मांगलेचे सरपंच प्रल्हाद पाटील, माजी सरपंच विजय पाटील, विश्‍वासचे संचालक संदीप तडाखे, सोसायटी अध्यक्ष राजेंद्र दशवंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माळी, बाजार समिती सर्व संचालक आनंदा पाटील, सुरेश पाटील, पांडुरंग गायकवाड, महादेव जाधव, सखाराम दुर्गे, सुजित देशमुख, जयश्री पाटील, सुनंदा पाटील, संदीप चोरगे, संग्राम पवार, मारुती कांबळे, मुनिर डांगे, प्रताप दिलवाले, वासीम मोमीन, संजय सावंत, हरिबा पावणे यांच्यासह बाजार समिती सचिव हणमंतराव पाटील, के. डी. मगदूम, जी. बी. पाटील, बी. डी. पाटील, डी. के. माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS