Homeताज्या बातम्या

पुण्यात मसाज सेंटरच्या नावाने वेश्याव्यवसाय

4 परदेशी महिला ताब्यात, गुन्हा दाखल

पुणे ः कोंढव्यातील एका मसाज सेंटरमध्ये सुरु असलेला वेश्या व्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत उघडकीस आणला. या कारवा

पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा पुतळा जयंतीदिनी अनावरण करण्याचे नियोजन करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाडिक गटाची एंट्री; कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष
प्रा. सोफियाँ मुल्ला यांना पीएचडी पदवी प्रदान

पुणे ः कोंढव्यातील एका मसाज सेंटरमध्ये सुरु असलेला वेश्या व्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी चार परदेशी महिलांना ताब्यात घेतले होते. सदर ताब्यात घेतलेल्या चार महिला मूळच्या थायलंडच्या रहिवासी असून त्या नोकरी करण्याचा व्हिसा नसताना मसाज सेंटरमध्ये काम करत असल्याचे चौकशीत उघडकीस आले होते.त्यामुळे पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून मसाज सेंटरचा मालक, व्यवस्थापकासह जागा मालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रविवारी देण्यात आली आहे. विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर राजा म्हणाले, याबाबत गुन्हे शाखेच्या पथकाने कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या परदेशी चार महिलांना मुंढव्यातील शासकीय महिला सुधारगृहात ठेवण्यात आले.परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या नियमावलीनुसार परदेशी व्यक्तीने नोकरी करण्यासाठी व्हिसासंदर्भातील आवश्यक त्या कागदपत्रांची वेळेत पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यामुळे सदर महिलांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात येईल. ते पुढे म्हणाले,कोंढव्यातील एका मसाज सेंटरमध्ये परदेशी महिलांना नोकरीस ठेवून व्हिसा कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी मसाज सेंटरचा मालक, व्यवस्थापक तसेच मसाज सेंटरला व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देणार्‍या मालकाच्या विरुद्ध विशेष शाखेच्या परकीय नागरिक नोंदणी (एफआरओ) विभागाकडून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुढील तपास कोंढवा पोलिस करता आहे.

COMMENTS