Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात महिला काँग्रेसच्यावतीने मूक आंदोलन

पुणे ः काँग्रेस पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी तडकाफडकी रद्द झाल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यात रविवारी मूक आंदोलन करण्या

खर्डा येथे भव्य ईद मिलन कार्यक्रम उत्साहात
अ‍ॅड. उज्ज्वल निकम लढवणार श्रद्धा वालकर हत्येचा खटला ?
राज्यात एक कोटी सहा लाख टन साखर उत्पादन ; इथेनॉल उत्पादनात महाराष्ट्राचा झेंडा उंच

पुणे ः काँग्रेस पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी तडकाफडकी रद्द झाल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यात रविवारी मूक आंदोलन करण्यात आले. कसब्यात फडके हौद चौक येथे महिलांनी सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.यावेळीं काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे म्हणाल्या,आम्ही न्यायालयाचा अपमान करू इच्छित नाही परंतु हे मोदी सरकार लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम करत आहे.खासदारकी रद्द करण्याची एवढी घाई म्हणजे ही सूडनितीचे राजकारण चालू आहे. आता हे जनतेच्या पण लक्षात आले आहे.
राहुल गांधी हे भ्रष्टाचारी अदानी, मेहुल चोक्सी, निरव मोदी, ललित मोदी यांच्या विरोधात बोलत होते. सत्य जनते समोर आणत होते, जे भ्रष्टाचार करून भारत सोडून पळून गेले आहेत.असेही त्या म्हणाल्या. कर्नाटकातील कोलार येथे 2019 झालेल्या सभेत मेहुल चोक्सी, ललित मोदी, निरव मोदी हे आपल्या देशाचे पैसे चोरून घेऊन गेले. त्यात त्यांनी चोर मोदींच्या मित्रांसोबत 56 इंच मोदी यांचेही नाव घेतले म्हणून त्यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला गेला होता. याप्रकरणात सुरत न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधींना दोषी ठरवले. या निर्णयानंतर न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि 15 हजारांचा दंडही ठोठावला. आता सध्या नागरिकांचा,आणि राजकीय पक्षांचा आवाज दाबण्याचा भाजपा आणि मोदी सरकार करत असते. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे . ह्याच्या विरुध्द आवाज हा उठवलाच पाहिजे.आणि तो आवाज राहुल गांधी यांनी उठविला आहे. आपल्या देशातील सर्व सामन्यांचे मूलभूत हक्क, भाषण स्वातंत्र्य आणि लोकशाही अभिव्यक्ती, दडपण्याच्या हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. हा आपल्या सविंधानाचा पण अपमान आहे. असेही महिला म्हणाल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी, पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद, नगरसेविका वैशाली मराठे, लता राजगुरू, रजनी त्रिभुवन, सचिव सुजता चिंता, सचिव स्वाती शिंदे, अ‍ॅड राजश्री अडसूळ, अनुसुया गायकवांड, ज्योती परदेशी, वैशाली परदेशी, गीता तारु महाडिक इत्यादी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

COMMENTS