ताई आणि भाऊंचे प्रमोशन की डिमोशन ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

ताई आणि भाऊंचे प्रमोशन की डिमोशन ?

कुठल्याही समाजाची सर्व तऱ्हेची प्रगल्भता वाढवणे हे सर्वस्वी त्या समाजाच्या नेत्यावर अवलंबून असते. पण, तो नेता निर्लोभी असावा लागतो. बुद्धिमान निर्लोभ

पाणीटंचाईचे संकट
आता हमीभावासाठी शेतकर्‍यांचा लढा
निसर्गाचा नजारा

कुठल्याही समाजाची सर्व तऱ्हेची प्रगल्भता वाढवणे हे सर्वस्वी त्या समाजाच्या नेत्यावर अवलंबून असते. पण, तो नेता निर्लोभी असावा लागतो. बुद्धिमान निर्लोभी नेता समाजाला एक दिशा देऊ शकतो, असा त्याच्यावर भरवसा ठेवता येऊ शकतो. तसा भरवसा दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्यावर समाजाने ठेवला. गोपीनाथराव मुंडे यांनी वंजारी समाजाचे नाव जगाच्या पटलावर फडकले हा इतिहास कुणालाही नाकारता येणार नाही. पण त्याअगोदर संत भगवान बाबा यांनी समाजाला दिलेले मूलमंत्र या समाजाच्या विकासाचा आत्मा म्हणावा लगे. प्रगल्भता शिक्षणातून येते हे खरेच म्हणून संत भगवान बाबा यांनी शाळा, वसतिगृह सुरु केले.’जमीन विका पण लेकरांना शिकवा’ हा बाबांचा मूलमंत्र. लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धा काढणाऱ्या बाबांसारख्या महान समाजसुधारकाला पुढे दैवीरूपात दाखवण्याचे कटकारस्थान रचले आणि त्यावर सुरु असलेल्या विदेश वाऱ्या हा आपला विषय नाही. पण हे समजून घेणे आवश्यक आहे. बाबांनी नारळी सप्ताहच्या माध्यमातून प्रबोधन केले. पण आज अनेक महाराजांनी सप्ताहाचे धंदे केले आहेत. हा विषय तसा स्वतंत्र आहे. त्यावरती नंतर आवश्य चर्चा होईल. असो, थोर माणूस इतिहास घडवतो हा सिद्धांत आपल्याला स्विकारावाच जगतो.
आयुष्यभर भटजी- शेटजींच्या पक्षात राहून गोपीनाथराव मुंडे यांनी सर्व जाती- धर्माच्या समाजाचे कार्यकर्ते सोबत घेऊन पक्ष वाढविला. मुस्लिम समाजाबद्दल संघाची आणि भाजपची आत्मिक व्दिदाची भावना होती तरीही गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे या पक्षात मुस्लिमांची एक मोठी फळी होती. ओबीसी समाजाचे देशपातळीवर नेतृत्व करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वैचारिक वारासदाराची आज वानवा आहे हे जड अंतःकरणाने मांडावे लागत आहे. वारसदार हा रक्ताच्या नात्याने सिद्ध होत नसतो तर तो विचारांच्या नात्याने सिद्ध होत असतो. रक्ताच्या नात्याचा वारसदार हा संपत्तीचा वारसदार असतो यापुढे तो जाऊ शकत नाही.
त्यामुळे पंकजा आणि प्रितम मुंडे यांनी ते सिद्ध करून दाखवले आहे. धनंजय मुंडे यांनी तर गोपीनाथराव मुंडे यांना हयातीत त्रास दिला हे कोण नाकारणार? धनंजय यांच्या तत्कालीन वर्तनव्यवहारामुळे गोपीनाथराव मुंडे भर सभेमध्ये ढसा- ढसा रडले आहेत. या त्यागी माणसाचा अखेरच्या टप्यात कुणी छळ केला? हे आम्ही सांगण्याची गरज नाही. ओबीसी समाजाच्या (माधव) बळावर प्रस्थापितांचे राजकारण मोडीत काढणाऱ्या गोपीनाथ मुंडेंचा पहिला फितूर त्यांचा राजकीय वारसदार कसा असू शकतो? आणि त्यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा देश आणि राज्य स्तरावरील राजकीय वारसा बीड- परळी मतदार संघापुरता मर्यादित करणाऱ्या पंकजा आणि प्रीतम मुंडे या त्यांच्या राजकीय वारसदार कशा?
गोपीनाथ मुंढे यांचे विशाल राजकारण, त्यांचा दृष्टिकोन, त्यांनी व्यापलेली समाजाची अमर्याद नाळ टिकवणे ही एक परीक्षा होती. त्यात कोण पास आणि नापास हे ठरवण्याएवढे वाचक प्रगल्भ आहेत. गोपीनाथ मुंडे वजा जर पंकजा, धनंजय, प्रीतम असे गणित केले तर उत्तर काय येईल हे आम्ही सांगण्याची गरज नाही. मुद्दा एवढाच आहे या परीक्षेत गोपीनाथ मुंडे नावाची कॉपी सुद्धा करता येत नसल्यामुळे लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्यांना आज आमदारकीकडे डोळे लावून बसावे लागते. आणि राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते हे  मुख्यमंत्र्यांच्या दर्जाचे पद सांभाळणारे धनंजय सत्तेत सामाजिक मंत्र्यांचा टमरेल वाजवत फिरतात हे ताई आणि भाऊंचे प्रमोशन की डिमोशन? देशाचे राजकारण हलविणारे, लोकप्रिय नेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा आज स्मृतिदिन… त्यांना विनम्र अभिवादन! आणि बहीण- भावांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यापेक्षा थोडे कर्तृत्व दाखवावे ही अपेक्षा. 

COMMENTS