Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांचा वारणावती येथील वन्यजीव कार्यालयावर मोर्चा

वारणावती : विनोबाग्राम, मणदुर धनगरवाडा, खुंदलापूर, जानाईवाडी येथील ग्रामस्थांचा वारणावती येथील वन्यजीव कार्यालयावर आलेला मोर्चा (छाया : आनंदा सुतार,

मिनाक्षीताई महाडिक यांचे पद रद्द करु पाहणार्‍यांना चपराक : जगन्नाथ माळी
अखेर हेळगाव चिंचणी रस्त्याच्या कामाला सुरुवात
यवतमाळ जिल्ह्यातील 104 वर्षीय आजोबांची नायगावला भेट

शिराळा / प्रतिनिधी : वारणावती येथील वन्यजीव कार्यालयाचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांच्या निषेधार्थ व गेल्या कित्तेक वर्षांपासून शासनाने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेल्या विनोबाग्राम, मणदुर धनगरवाडा, खुंदलापूर, जाणाईवाडी येथील ग्रामस्थांच्या जमिनीबाबतच्या प्रश्‍नांसाठी काल प्रजासत्ताक दिनादिनी वन्यजीव कार्यालयावर येथील शेतकर्‍यांनी आपल्या मुलाबाळांसह मोर्चा काढला. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी यावेळी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता.
मणदुर येथील हुतात्मा स्मारकापासून हुतात्म्यांना अभिवादन करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. वन्यजीव कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, संत रविदास चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र सहसचिव संभाजीराव कांबळे, शेतकरी नेते गौरवभाऊ नायकवडी, सत्यजितराव देशमुख, हणमंतराव पाटील, वाळवा ग्रामपंचायत सदस्य उमेश कानडे, कॉ. हरीश कांबळे आदी प्रमुख नेत्यांनी शेतकर्‍यांच्या जमिनी संदर्भातील विविध प्रश्‍नांवर महसूल व वन्यजीव प्रशासनावर ताशेरे ओढले.
सायंकाळी उशिरा वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलक व अधिकार्‍यांची बैठक झाली. शेतकर्‍यांच्या काही मागण्यांबाबतीत बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. आंदोलनामध्ये परिसरातील सर्व लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान एका आंदोलकास हृदय विकाराचा झटका आला. प्रशासनाच्यावतीने आंदोलनस्थळी आरोग्य सेवेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने आंदोलकास तातडीने पुढील उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

COMMENTS