Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड-वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड । प्रतिनिधी नांदेड-वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पड

पश्‍चिम बंगालमध्ये 58 लाख मतदार वगळले
जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर !
राजकीय गोडवा वाढणार का?

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड-वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
गुरूवार, 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत संबंधित आदेश लागू राहणार असून, याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दि. 9 जानेवारी 2026 रोजी निर्गमित केला आहे. या आदेशानुसार, ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या मतदान केंद्रापासून 200 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुढील बाबींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे मंडप, दुकाने, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले, तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे. यासोबतच, निवडणूक कामाव्यतिरिक्त खाजगी वाहने, संबंधित पक्षांची चिन्हे किंवा प्रचार साहित्याचे प्रदर्शन तसेच निवडणूक कामाशी संबंध नसलेल्या व्यक्तींना मतदान केंद्र परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी नागरिकांनी या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS