Homeताज्या बातम्यामनोरंजन

रणवीर सिंगसोबत ‘डॉन ३’मध्ये दिसणार प्रियांका चोप्रा

मुंबई प्रतिनिधी - डॉन 3'ची घोषणा झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता वेगळ्याच पातळीवर आहे. पण नंतर शाहरुख खान यात सहभागी होणार नाही हे कळल्यावर चा

अभिनेता रणबीर कपूरला ईडीकडून समन्स
तारक मेहता का उल्टा चष्मा मधील जेठालाल घेणार मोठा ब्रेक
प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने दाखवली सिंघम 3 ची झलक

मुंबई प्रतिनिधी – डॉन 3’ची घोषणा झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता वेगळ्याच पातळीवर आहे. पण नंतर शाहरुख खान यात सहभागी होणार नाही हे कळल्यावर चाहते दुखी झाले. फरहान अख्तरने रणवीर सिंगसोबतच्या ‘डॉन 3’ची पुष्टी केली आहे. या चित्रपटात रणवीर मुख्य नायक असून, आता मुख्य नायिकेचा शोध सुरू आहे. प्रियांका चोप्रा ‘डॉन 3’चा भाग बनू शकते, असे बोलले जात आहे फरहान अख्तर ‘डॉन 3’ कडे पहिले लक्ष देत आहे. तो लवकरच प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंगसोबत ‘डॉन 3’ च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. रिपोर्टनुसार, प्रियांकाने नुकतीच फरहान अख्तरची भेट घेतली आणि त्यांनी ‘डॉन 3’ बद्दल चर्चा केली.

प्रियांकाने ‘डॉन 3’ला होकार दिल्याचे बोलले जात आहे. फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. या चित्रपटासाठी यापूर्वी कियारा अडवाणी आणि क्रिती सेनॉनला अप्रोच करण्यात आले होते. मात्र कोणाचेही नाव निश्चित झाले नाही. आता ‘डॉन 3’चे शूटिंग कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, मात्र प्रियांका चोप्राचे नाव फायनल असल्याचे मानले जात आहे. प्रियांका चोप्राने यापूर्वी रणवीरसोबत ‘गुंडे’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिल धडकने दो’मध्ये काम केले होते. व्यावसायिक आघाडीबद्दल बोलायचे झाले तर, रणवीर सिंग सध्या ‘सिंघम अगेन’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तर प्रियांका चोप्रा तिच्या काही आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम पूर्ण करून ‘डॉन 3’ मध्ये सामील होऊ शकते. प्रियांका ‘सिटाडेल 2’ मध्येही दिसणार आहे.

COMMENTS