Homeताज्या बातम्याUncategorized

केरळमध्ये डुक्करांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची बाधा

केरळ : केरळमधील कोट्ट्याम जिल्ह्यातील एक फार्ममध्ये डुक्करांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. सर्व बाधित डुक्करांना ठार मारण्याचे आदेश देण्यात

भाजपने विरोधी मतांचे विभाजन करून हा विजय मिळविला : ना. जयंत पाटील
हुमगाव-बावधन प्रलंबित रस्त्यासाठी चाळीस गाव एकवटले
लोणंद मधील नव्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन कुणासाठी थांबलय?

केरळ : केरळमधील कोट्ट्याम जिल्ह्यातील एक फार्ममध्ये डुक्करांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. सर्व बाधित डुक्करांना ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठार मारल्यानंतर सर्व डुक्करांना याच फार्ममध्ये सुरक्षितरीत्या पुरण्यात येणार आहे. जवळपास 48 डुक्करांत हा आजार दिसून आला आहे.
आजार दिसून आलेल्या फार्मपासून 1 किलोमीटर त्रिजेचा परिसर बाधित म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात कडक निगराणी ठेवण्यात आली आहे. हा आजार इतर प्राण्यात पसरू नये, यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. हा आजार काही महिन्यांपूर्वी वायनाड आणि कोन्नूर या जिल्ह्यांत दिसून आला होता. हा आजार अत्यंत वेगाने फैलवतो. त्यामुळे प्राण्यांत ब्रेमहॅमरेज होऊन मृत्यू ओढवतो. पाळीव तसेच जंगली डुक्करांना हा आजार होतो.

COMMENTS