अहमदनगर जिल्हा भाजपला वेध…तीन मंत्रीपदांचे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा भाजपला वेध…तीन मंत्रीपदांचे

सत्कार सोहळ्यात प्रा.शिंदे-विखे-कर्डिलेंचा रंगला कलगीतुरा

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील विद्यमान महाविकास आघाडी सरकार कोसळून त्या जागी भाजपचे सरकार येणार असल्याचा विश्‍वास जिल्हा भाजपने व्यक्त केला आहे व तो

“त्या’नऊ जणांची सामूहिक आत्महत्या नसून हत्या दोन मंत्रिकांना अटक | LokNews24
१७ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा.                
नवीन खेळाडूंना चालना देण्याकरिता चेस इन स्कूल हा उपक्रम शहरात राबविणार -नरेंद्र फिरोदिया

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील विद्यमान महाविकास आघाडी सरकार कोसळून त्या जागी भाजपचे सरकार येणार असल्याचा विश्‍वास जिल्हा भाजपने व्यक्त केला आहे व तो करताना नगर जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळावीत, असा ठरावही करून टाकला आहे. विधान परिषदेचे नवे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यातील ही घटना चर्चेची झाली आहे. दरम्यान, या सोहळ्यात प्रा. शिंदेंसह आ. राधाकृष्ण विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात रंगलेला कलगीतुरा व शाब्दीक टोलेबाजी जिल्हा भाजपमध्ये उत्साह पेरून गेली आहे व संभाव्य भाजप सरकार व जिल्ह्यातील मंत्रीपदांचीही आस लागली आहे.
विधान परिषदेवर निवडून आल्याबद्दल प्रा. शिंदे यांचा सत्कार सोहळा जिल्हा भाजपाच्यावतीने येथील माऊली संकुलात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. विखे व माजी आ. कर्डिले यांच्यासह आमदार मोनिका राजळे तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, चंद्रशेखर कदम, स्नेहलता कोल्हे, माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे, प्रदेश कार्यकारी सदस्य प्रा.भानुदास बेरड, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, विश्‍वनाथ कोरडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, वसंत लोढा, महिला जिल्हाध्यक्षा अश्‍विनीताई थोरात आदी उपस्थित होेते.

तिघांची भाषणे रंगली
या सोहळ्यात प्रा. शिंदे, विखे व कर्डिलेंची भाषणे चांगलीच रंगली. तिघांनीही परस्परांवर मिश्किल भाष्य करताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. शिवसेनेच्या फुटीवरही यावेळी भाष्य करताना राज्यात भाजपचे सरकार आता पुन्हा येणार, असा विश्‍वासही व्यक्त केला गेला. प्रा. शिंदे यावेळी म्हणाले, माझे कुटूंब-माझी जबाबदारी म्हणणार्‍या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री गुवाहटीला रवाना झाल्याने राज्यात पहिल्यांदाच सत्ताधारी मुख्यमंत्र्यांचे मंत्री व आमदार मोठ्या प्रमाणात फुटून गेले असून, आता जनतेच्या मनातील सरकार लवकरच येणार आहे. या नव्या सरकारमध्ये जिल्ह्यातील तीन मंत्री करावे, असा ठरावच माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केल्यामुळे चिंताच राहिली नाही. माजी मंत्री कर्डिले जो ठराव करतात, तो भारतीय जनता पार्टी तंतोतंत अंमलात आणते. विधान परिषदेच्या माझ्या उमेदवारीसाठी कर्डिलेंचा ठरावच कामी आला असल्याचे ते म्हणाले. तर यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले, मी तोंड पाहून भविष्य सांगतो, मला राम शिंदे आमदार होणार हे माहीत होते म्हणूनच मी ठरावाचा आग्रह धरला आणि ते आमदार झाले. आता सरकारही बदलणार आहे. माझ्या ठरावाची राज्य नेतृत्व दखल घेत असेल तर मी आजच नव्या सरकारमध्ये जिल्ह्याला तीन मंत्री मिळावे, असा ठराव करतो. मंत्री झाल्यावर आमच्याकडेही लक्ष असू द्या, मी माजी आहे, मला माजीच ठेवू नका, असे ते म्हणताच सभागृहात हशा उसळला. यावेळी विखे म्हणाले की, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकरांचा वारसा असलेले व राष्ट्रीय राजकारणात झोकून दिल्यामुळेच प्रा. शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळाली, असे ते म्हणाले. यावेळी आमदार राजळे, माजी आमदार मुरकुटे, कोल्हे, कदम व प्रा. बेरड यांची भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले तर आभार शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी मानले. यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, सुवेंद्र गांधी, सचिन पोटरे, महेश तवले, अ‍ॅड.विवेक नाईक, तुषार पोटे, दिलीप भालसिंग, दत्तात्रय महाडिक, अ‍ॅड.युवराज पोटे, शांतीलाल कोपनर, सुनील रामदासी, महेश नामदे, बाबासाहेब सानप, अंजली वल्लाकट्टी, सोनाली नाईकवाडी, सुनील यादव उपस्थित होते.

संधी आणि दुकानदारी
आमदारांमधून आमदार होण्याची संधी नगर जिल्ह्यात फार कमी लोकांना मिळाली. त्यामध्ये माझा समावेश आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे, राज्यसभेच्या वेळी मला उमेदवारी देण्याचे पक्ष नेतृत्वाने ठरविले होते. मात्र तिन्ही जिल्हाध्यक्षांनी विधान परिषदेचा ठराव केला. तो ठराव वरिष्ठांनी मान्य करीत मला आमदार केले, असे प्रा. शिंदे म्हणाले. तर माझ्यात आणि प्रा.शिंदे यांच्यात भांडणे कोणीही लावू नये. आम्ही दोघेही एक आहोत, आमच्या भांडणावर दुकानदारी करणार्‍यांचे दिवस भरले आहेत, असा इशारा विखे यांनी दिला.

COMMENTS