Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौर्‍यावर

निळवंडे धरणाचे जलपूजन करून कालव्याचे करणार लोकार्पण

अहमदनगर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरूवारी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असून, या दौर्‍यात तब्बल 75 हजार कोटी रूपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद

पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान
रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा
इंडिया आघाडीची 4 जूनला ‘एक्सपायरी डेट’

अहमदनगर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरूवारी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असून, या दौर्‍यात तब्बल 75 हजार कोटी रूपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहेत. तसेच शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन तसेच 86 लाखांहून अधिक शेतकर्‍यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि निळवंडे धरणाचे जलपूजन करून कालव्याचे लोकार्पण करणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी एकच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचणार आहेत. श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन घेऊन, मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. दुपारी दोन वाजता, पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या कालव्याचे लोकार्पण करतील. 3.15 च्या सुमारास शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल आणि वायू यांसारख्या क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.शिर्डी संस्थान येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त नवीन दर्शनरांग संकुलाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या नवीन इमारतीत विविध सोयीसुविधांची असणार आहेत. यामध्ये दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह अनेक वेटिंग हॉल, क्लोक रूम, स्वच्छतागृहे, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्रासारख्या वातानुकूलित कक्षांची सोय करण्यात आली आहे. शिर्डी संस्थानचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या काठाच्या (85 किमी) कालव्याचे जाळे देशाला समर्पित करणार आहेत. यामुळे पाण्याचे पाइप वितरण जाळे सुकर होईल व सात तालुक्यांतील (अहमदनगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील एक) 182 गावांना याचा लाभ होणार आहे. यासाठी सुमारे 5177 कोटी रुपये निधी खर्च करण्यात येत आहे.

COMMENTS