Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींनी केली 41 हजार कोटींच्या प्रकल्पाची घोषणा

तब्बल 27 राज्यातील 553 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

सोलापूर/नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सुमारे 41 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये दोन हजारांहून जास्त प्रक

योगाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवा
रेल्वेच्या 85 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी
दिल्लीतून येणार मोदींचे भोजन ;  अन्नसुरक्षेसाठी २२ अधिकारी  

सोलापूर/नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सुमारे 41 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये दोन हजारांहून जास्त प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी एकट्या रेल्वे खात्यासाठी घेऊन आले आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत 553 स्टेशन्सची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यावेळी सर्व प्रकल्प देशाला समर्पित करतो अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदींच्या आजच्या निर्णयामुळे देशातल्या 27 राज्यांमधल्या 553 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी त्यांच्या द अकाऊंटवरुनही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन प्रेस कॉन्फरन्स घेत विविध प्रकल्प आणि योजनांचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्रीही उपस्थित होती. आपण पहिल्यांदाच 2 हजार योजना एकाचवेळी सुरु करत आहोत. रेल्वेच्या पायाभूत बदलांमध्ये महत्त्वाच्या बदलांची सुरुवात करण्याचा हा दिवस आहे असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. याशिवाय 1500 ओव्हरब्रिज, अंडरपास यांचंही भूमिपूजन करण्यात आले. उत्तर प्रदेशात 252, महाराष्ट्रात 175, मध्यप्रदेशात 133, गुजरात 128, तामिळनाडूत 115, राजस्थानात 106, छत्तीसगड 90 आणि झारखंडमध्ये 83 प्रकल्पांचा समावेश आहे.

दरम्यान, अमृत भारत स्टेशन प्लॅनमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा सातत्यपूर्ण विकास करणे अपेक्षित आहे. भारतीय रेल्वेने अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील 1309 स्थानके ओळखली आहेत. महाराष्ट्राला यंदाच्या अर्थसंकल्पात 15 हजार 554 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली असून अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 56 स्थानके जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. सोलापूर विभागाच्या अमृत भारत स्टेशन योजना या कार्यक्रमासाठी बेलापूर रेल्वे स्थानकावर माननीय खासदार सदाशिव लोखंडे,  गाणगापूर रेल्वे स्थानकावर खासदार डॉ. उमेश जाधव, दुधनी रेल्वे स्थानकावर माननीय खासदार डॉ. शिवाचार्य जयसिद्धेश्‍वर महास्वामी आणि जेऊर  रेल्वे स्थानकावर खासदार  रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे मुख्य अतिथी म्हणून लाभले. शिवाय आरयुबी च्या महोत्त्सवाच्या ठिकाणी ग्रामस्थ तसेच गावपातळीवरील प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि विविध माध्यमांचे प्रतिनिधी यांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. ह्या महोत्सवात शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक, पालक  इत्यादी लोकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. तसेच शाळकरी मुलांनी देशभक्तीपर गीतांवर संस्कृतीक कार्यक्रम, कला, नृत्य आणि पोवाडा,लोकगीत गायन इ. कलाप्रकार सादर केले. कार्यक्रम प्रसंगी येणार्‍या प्रत्यक्षदर्शीना सोलापूर रेल्वे विभागातर्फे वाहतुकीची, पाण्याची तसेच अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.    

सोलापूर विभागातील 4 स्थानकांचा होणार कायापालट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील 4 स्थानकावर अपग्रेडेशन कामाची व्हिडिओ कॉन्फरन्सच्याद्वारे सोमवारी पायाभरणी केली. शिवाय 9 रोड ओव्हर ब्रिज आणि रोड अंडर ब्रिजेसचे उद्घाटनही यावेळी केले. अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत येणार्‍या काळात सोलापूर विभागातील 4 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. बेलापूर, गाणगापूर, दुधनी आणि जेऊर स्टेशन यांना अनुक्रमे 31.96 कोटी,20.78 कोटी,21.86 कोटी आणि 14.73 कोटी इतका प्रत्यक्षदर्शी कामांसाठी निधी रेल्वे बोर्डाने जाहीर केला आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही पंतप्रधान मोदी यांनी आणलेला एक दूरदर्शी उपक्रम आहे, ज्या अंतर्गत देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जाईल आणि आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनलमध्ये रूपांतरित केले जाईल, ट्रॅव्हल हबचे पुनरुज्जीवन केले जाईल आणि एकूण प्रवाशांचा अनुभव वाढेल. एका सामान्य रेल्वे प्रवाशाला आरामदायी, सोयीस्कर आणि आनंददायी रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळू शकतो.

COMMENTS