Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किटकनाशकांच्या सुरक्षित वापरासाठी सूचना

बीड प्रतिनिधी - हे करा खरेदी करताना वैध परवाना असलेल्या नोंदणीकृत कीटकनाशक विक्रेत्यांकडूनच कीटकनाशके खरेदी करा. एका विशिष्ट क्षेत्रात एका फवारण

कृषी विभागाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावेत.
देशात महागाई आणि बेरोजगारीचा उच्चांक
 बुलढाणा जिल्ह्यात नाफेड कडून 11 हरभरा खरेदी केंद्रांना मान्यता

बीड प्रतिनिधी – हे करा खरेदी करताना वैध परवाना असलेल्या नोंदणीकृत कीटकनाशक विक्रेत्यांकडूनच कीटकनाशके खरेदी करा. एका विशिष्ट क्षेत्रात एका फवारणीसाठी आवश्यक असतील तेवढेच कीटकनाशके खरेदी करा.कीटकनाशकांच्या डबा/पॅकेट्सवर मंजूर लेबले पहा.लेबलांवर बॅच क्रमांक, नोंदणी क्रमांक, उत्पादनाची तारीख/ कालबाह्यता पहा.  डब्यामध्ये/पॅकेटमध्ये चांगले पॅक केलेले सिलबंद कीटकनाशके खरेदी करा. साठवणुकी दरम्यान कीटकनाशके घरापासून दूर ठेवा. मूळ डब्यामध्ये/पॅकेटमध्ये कीटकनाशके ठेवा.कीटकनाशके/तणनाशके स्वतंत्रपणे साठवली पाहिजेत.जेथे कीटकनाशके साठवली गेली आहेत, ते क्षेत्र चेतावणी चिन्हांसह चिन्हांकित केले जावे. कीटकनाशके मुलांच्या आवाक्याबाहेर आणि जिवंत साठ्यापासून दूर ठेवावीत. साठवण ठिकाण थेट सूर्यप्रकाश आणि पावसापासून चांगले संरक्षित केले पाहिजे.

हाताळताना हे करु नका वाहतूक करताना कीटकनाशके इतर पदार्थापासुन वेगळे ठेवा.मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी कीटकनाशके कुशलतेने हाताळावीत. खरेदी करताना फूटपाथ विक्रेत्यांकडून किंवा परवाना नसलेल्या व्यक्तीकडून कीटकनाशके खरेदी करू  नका. संपूर्ण हंगामासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशके खरेदी करू नका.डब्यावर मान्यताप्राप्त लेबल नसलेली कीटकनाशके खरेदी करू नका. कालबाह्य झालेले कीटकनाशक कधीही खरेदी करू नका. सीलबंद नसलेल्या, गळती होत असलेल्या डब्यामधून/पॅकेटमधुन कीटकनाशके खरेदी करू नका. साठवणुकी दरम्यान घराच्या आवारात कधीही कीटकनाशके ठेवू नका.  डबा/पॅकेटमधील किटकनाशके दुसर्‍या भांडयामध्ये ओतुन ठेवू नका. तणनाशके व कीटकनाशके एकत्र साठवू नका.मुलांना व जनावरांना साठवणुकीच्या ठिकाणी जाऊ देऊ नका. कीटकनाशकांना थेट सूर्यप्रकाश लागु नये किंवा ती पावसाच्या पाण्यात जाऊ नयेत यासाठी आवश्यक काळजी घ्या. हाताळताना अन्न/चारा/इतर खाण्यायोग्य वस्तूंसोबत कधीही कीटकनाशके बाळगू नका/वाहतूक करू नका.मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी कीटकनाशके डोक्यावर, खांद्यावर किंवा पाठीवर वाहुन नेऊ नये.

COMMENTS