उपसभापतींच्या निर्णयाविरोधात शिंदे गट जाणार न्यायालयात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपसभापतींच्या निर्णयाविरोधात शिंदे गट जाणार न्यायालयात

मुंबई :राज्यात सत्तांतराच्या हालचालींनी जोर धरला असून, राज्यपाल महोदय कोरोनातून सावरल्यामुळे भाजप आता सत्तांतरासाठी पुढे सरसावल्याचे चित्र आहे. तर दु

अक्षय कुमार केदारनाथ बाबाच्या चरणी
आचारसंहिता उल्लंघनाच्या 79 हजार हून अधिक तक्रारी
शिवसेना पदाधिकार्‍याच्या भावास ठार मारण्याची धमकी

मुंबई :राज्यात सत्तांतराच्या हालचालींनी जोर धरला असून, राज्यपाल महोदय कोरोनातून सावरल्यामुळे भाजप आता सत्तांतरासाठी पुढे सरसावल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट विधानसभेच्या उपसभापतींच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांच्या विनंतीवरून विधानसभेच्या उपसभापतींनी शिंदे यांची या पदावरून हकालपट्टी केली. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उपसभापतींनी किमान सात दिवसांची नोटीस द्यायला हवी होती, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे.
दरम्यान, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदार गुवाहाटी हॉटेलमध्ये आपली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाची बैठक होत आहे, ज्यामध्ये पुढील रणनीती आणि कायदेशीर पैलूंवर चर्चा केली जाऊ शकते. शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याच्या उपसभापतींच्या निर्णयाला एकनाथ शिंदे कॅम्प सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर एकनाथ शिंदे यांना विधानसभा सचिवालयातून हटवून अजय चौधरी यांना विधिमंडळ पक्षनेते बनवण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केली होती. गुरुवारी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेची विनंती मान्य करत शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांच्या नावाला मंजुरी दिली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नरहरी झिरवाळ यांना हटवण्याची मागणी केली होती.
अजय चौधरी यांसदर्भात बोलतांना म्हणालने की, 25 आमदारांनी शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी त्यांच्या नियुक्तीला पाठिंबा दिला आहे. अजय चौधरी शिवडी, मुंबईचे आमदार आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे खास मानले जातात. शिवडीतून ते दोन वेळा आमदार राहिले आहेत. यापूर्वी 2015 मध्ये त्यांना शिवसेनेने नाशिकचे जिल्हाप्रमुख केले होते. दरम्यान, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदार गुवाहाटी हॉटेलमध्ये आपली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. त्याचवेळी मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शिंदे आणि बंडखोर आमदारांचा निषेध सुरू केला आहे. बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ मुंबईतील सामनाच्या कार्यालयाबाहेर रविवारी बाईक रॅली काढण्यात आली. शूज मारो आंदोलनांतर्गत बंडखोरांच्या पोस्टर्सवर शूज आणि चप्पलांचा वर्षाव करण्यात आला.

बंडखोरांकडून शिंदेंसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी
आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी बंडखोर आमदारांनी केल्याची माहिती आहे. गुवाहाटीत झालेल्या बैठकीत सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेबाबत चर्चा झाली आहे. पुढचा आठवडा राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेचे सर्वाधिकार बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदेंना दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 39 तर 10 अपक्ष आमदार आहेत. अशा स्थितीत बंडखोरांचा नेताच मुख्यमंत्री व्हावा, अशी मागणी बंडखोरांतील काही मंत्र्यांनी केल्याची माहिती आहे.

COMMENTS