कर्तृत्व आणि नेतृत्व गुणांचा संगम म्हणजे स्व.शंकरराव काळे-उपमुख्यमंत्री

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्तृत्व आणि नेतृत्व गुणांचा संगम म्हणजे स्व.शंकरराव काळे-उपमुख्यमंत्री

सांगितलेले काम केले नाही तर पवाराची औलाद नाही

कोपरगाव प्रतिनिधी -सन १९९१साली लोकसभेत स्व.काळें समवेत मी खासदार म्हणून निवडून आलो.कोपरगावने साखर कारखान्याच्या माध्यमातून देशाला आर्थिक सुबत्ता दाखव

आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर l DAINIK LOKMNTHAN
विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान ह सेवेचे, प्रबोधनाचे ज्ञानतीर्थ ः शिवाजीराव कपाळे
घर घर लंगर सेवेने साजरी केली रस्त्यावरील वंचितांची दिवाळी वंचितांना फराळचे वाटप

कोपरगाव प्रतिनिधी -सन १९९१साली लोकसभेत स्व.काळें समवेत मी खासदार म्हणून निवडून आलो.कोपरगावने साखर कारखान्याच्या माध्यमातून देशाला आर्थिक सुबत्ता दाखवून दिली आहे.आम्ही कितीही गप्पा केल्या तरी मतदारसंघ सोडून निवडणूक लढवून विजय मिळवणे सोपे नाही.दुसऱ्या मतदारसंघात जाऊन अशक्य शक्य करुन दाखवले.कारण स्व.काळेसाहेबांकडे कर्तृत्व आणि नेतृत्वगुणांचा संगम असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

      कोपरगाव नुतन पोलिस स्टेशन इमारत,बस स्थानक,पंचायत समिती कार्यालय या विकासकामांचा आणि स्व.शंकरराव काळे यांचा पंचायत समिती आवारात उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.माजी आमदार अशोकराव काळे यांचे अध्यक्षतेखाली ग्रामविकासमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ,गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. पुढे पवार म्हणाले,स्व.काळेंनी कर्मवीर अण्णांचा वारसा पुढे चालविला.रयतसाठी त्यांचे योगदान फार मोठे आहे.अनेक वर्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन होते.यावेळी कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनसाठी आणि ८ अधिकारी ७२कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी २५कोटी रुपयांचा निधी आशुतोष काळेंना देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ग्रामविकासमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोपरगावच्या रस्त्यांसाठी निधी कमी पडून देणार नसल्याची ग्वाही देत,मतदारसंघ चकाचक करुन टाकणार असल्याचे सुतोवाच केले.तर गृहमंत्री दिलीप वळसेपाटील म्हणाले,आशुतोषने आजोबा आणि वडीलांचा वारसा पुढे सक्षमपणे चालविला आहे.राज्यात काळे आणि कोल्हे सदैव राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ. राजश्रीताई घुले, खासदार सुजय विखे पाटील, आमदार  सुधीरजी तांबे, आमदार किशोरजी दराडे, माजी आमदार  चंद्रशेखरजी घुले , दादाभाऊ कळमकर ,  भानुदास मुरकुटे , पांडुरंगजी अभंग ,  भाऊसाहेब चिकटगावकर , जयंत जाधव , चंद्रशेखर कदम , विभागीय आयुक्त  राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस उपायुक्त  बी.जी. चंद्रशेखर पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मनोज पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्या सौ. मिनाताई जगधने, संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त कु. अनुराधाताई आदिक, अनिलराव शिंदे, सौ. स्नेहलताताई शिंदे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, डॉ. मेघनाताई देशमुख, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे, श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, अविनाश दंडवते, सुहास आहेर,  सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीपजी वर्पे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष  कारभारी आगवण, उपाध्यक्ष  नारायणराव मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, आजी – माजी संचालक, जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी – माजी सदस्य, आजी – नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   

  दादांचे काम म्हणजे एक घाव दोन तुकडे

अडीच वर्षात एक हजार कोटींची कामे मिळाल्याचे समाधान असुन,अजितदादा आणि सरकार पाठीशी खंबीरपणे उभे आहे.कोपरगावचा पाणीप्रश्न आणि रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार व्यक्त करत.शरद पवारांकडे आजोबा तर अजितदादांकडे वडीलांच्या रुपात बघतो.माजी आमदार अशोकराव काळे आणि अजितदादांचा स्वभाव म्हणजे एक घाव दोन तुकडे

   नामदार आशुतोष काळे (अध्यक्ष ,साईबाबा संस्थान शिर्डी)

       

आशुतोष काळे कोपरगावचा चेहरामोहरा बदलणार

 आज असणारी कॕबिनेटची बैठक पुढे ढकलुन यावं लागलं.मागिलवेळी मताधिक्य कमी मिळाले आम्ही साधु-संत नाही.यावेळी आशुतोषला मताधिक्य वाढले पाहिजे.सांगितलेली कामे केली नाही तर पवाराची औलाद नाही.आशुतोष कोपरगावचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही.त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहे. अजित पवार ,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

COMMENTS