Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लेखी आश्‍वासनानंतर प्रहारचे उपोषण स्थगित

श्रीगोंदा प्रतिनिधी ः मौजे देऊळगाव भानगाव शिवरस्ताचे डांबरीकरणाचे काम पूरर्ण झाले परंतु सदरचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असुन सदरचा रस्ता

एसटी बस आणि कारच्या धडकेचा चौघांचा मृत्यू
चासनळी, हंडेवाडी व कुंभारीत विकासकामांचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन
नगरकरांनो, घरपट्टी व पाणीपट्टी माफी मिळणार नाही…; कोविड ही नैसर्गिक आपत्ती नसल्याचे महापालिकेने केले स्पष्ट

श्रीगोंदा प्रतिनिधी ः मौजे देऊळगाव भानगाव शिवरस्ताचे डांबरीकरणाचे काम पूरर्ण झाले परंतु सदरचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असुन सदरचा रस्ता हा लवकरच उखडू शकतो. रस्ताच्या साईडपट्ट्या ह्या मुरुमाने न भरता दगडाने भरलेल्या आहेत. कोणतेही काम पक्के व चांगल्या दर्जाचे झाले नसल्याचे संबंधित ठेकेदार यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु त्यांनी आमचे काहीही ऐकून घेतले नाही. नकारात्मक भूमिका दर्शवली.
सदरचे काम इस्टीमेट नुसार झालेले नसुन सदरच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. तरी संबंधित कामांची चौकशी होऊन संबंधित ठेकेदार व इंजिनीअर यांच्यावर कडक कारवाई करावी  यासाठी प्रहारने सोमवारपासून उपोषण सुरु केले होते. उपविभागीय अधिकारी सुरेश काराळे यांनी पंधरा दिवसांत चौकशी करुन कारवाई करु असे लेखी आश्‍वासनानंतर प्रहारचे उपोषण स्थगित करण्यात आले. उपोषणास शहराध्यक्ष माधव बनसुडे तालुकाध्यक्ष कृष्णा खामकर संतोष उर्फ गुरु गायकवाड, अमोल कांबळे, सचिन गोंटे अध्यक्ष प्रहार वाहन चालक संघटना, ज्ञानदेव कांबळे सह ग्रामस्थ बसले आहेत.

COMMENTS