Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारसू प्रकल्पाच्या विरोधात लाल निशाण पक्षाचे आंदोलन

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः कोकणात राजापूर तालुक्यातील बारसु-सोलगाव रिफायनरी प्रकल्प रद्द करणे, मुबंई-वडोदरा महामार्ग कामाच्या दरम्यान डहाणू परिसरात द

उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान – आमदार थोरात
गावठी कट्टा व 6 जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार जेरबंद  
अल्पवयीन मुलीस आमीष दाखवून केले अपहरण

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः कोकणात राजापूर तालुक्यातील बारसु-सोलगाव रिफायनरी प्रकल्प रद्द करणे, मुबंई-वडोदरा महामार्ग कामाच्या दरम्यान डहाणू परिसरात दडपशाही केलेल्या आदिवासी समाजाला मोबदला देऊन पुनर्वसन करा व भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिह यांनी केलेल्या लैगिक शोषणा विरोधात दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या महिला कुस्तीपटूच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाल निशाण पक्षाच्या वतीने प्रशासकीय भवन, श्रीरामपूर येथे निदर्शने करून तहसीलदार यांना निवेदने देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार आर.जे.वाकचौरे यांनी निवेदन स्वीकारले.
             यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, देशभरात विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेचे लोकशाही हक्क डावलून त्यांच्या हक्काच्या जमिनी, पाणी, जंगले हे आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या व बड्या उद्योगपतीना हस्तांतरित करण्याचा सपाटा केंद्र व राज्य सरकारने सुरू केला आहे. राज्यात कोकणातील बारसु-सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामसभेचा रिफायनरी विरोधी ठराव असताना ही ग्रामस्थांना विचारात न घेता हा विनाशकारी महाकाय प्रकल्प राबविण्याचा घाट सरकारच्या वतीने घातला जात आहे.यामुळे कोकणातील जैविकदृष्ट्या संवेदनशील असणारी गावे,पश्‍चिम घाटाची संपन्नता-वैभव,स्वच्छ ब सुंदर समुद्र किनारे अक्षरशः काळवंडून गटारे बनणार आहे.ग्रीन रिफायनरीच्या नावाखाली कोकणचा विध्वंस  करणारा हा प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
       तसेच मुबंई-वडोदरा महामार्गाच्या कामादरम्यान अमानवी पध्दतीने दडपशाही करून विस्थापित केलेल्या आदिवासी बांधवांना योग्य मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन करावे,भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिह यांनी केलेल्या लैगिक शोषणा विरोधात दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या महिला कुस्तीपटूच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आरोपी खासदार ब्रिजभूषण सिह यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी आदी मागण्या करण्यात आले.सदर प्रश्‍नी तातडीने निर्णय न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी निदर्शनात जिल्हाध्यक्ष कॉ. राजेंद्र बावके, सरचिटणीस कॉ. जीवन सुरूडे, कॉ.शरद संसारे, कॉ.मदिना शेख,उत्तम माळी, अरुण बर्डे, अजय बत्तीसे, रंगनाथ दुशिंग, लक्ष्मण अटक,भीमराज पठारे,विरेश रणधीर, सुबाण पटेल, राहुल दाभाडे, विक्रम कोरडीवाल, भीमराज शेलार, रमेश शिंदे, किरण तोगे, शिवाजी ठोंबरे, शिवाजी शिंदे,अस्लम शेख, गोरख जाधव, लखन गोलवड, प्रकाश माळी, रमेश डुकरे, फकिरा जाधव आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS