ओबीसी व मराठा समाजावर राज्य सरकारने मोठा अन्याय केला : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी व मराठा समाजावर राज्य सरकारने मोठा अन्याय केला : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अहमदनगर – भाजपच्या काळात विकासाच्या शिखरावर गेलेल्या राज्याला अविकासाच्या वाटेवर या सरकारने नेऊन ठेवले आहे. तीन पक्षांचे सरकार पूर्णपणे अपयशी सरकार ठ

मनपातील सत्ताधारी राष्ट्रवादी कचराप्रश्‍नी आंदोलन पवित्र्यात
’वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ जीवनात हवीत ः कल्पनाताई वाघुंडे
महात्मा फुलेंनी वंचित घटकाला न्याय देण्याचे काम केले: प्रतापराव ढाकणे

अहमदनगर – भाजपच्या काळात विकासाच्या शिखरावर गेलेल्या राज्याला अविकासाच्या वाटेवर या सरकारने नेऊन ठेवले आहे. तीन पक्षांचे सरकार पूर्णपणे अपयशी सरकार ठरले आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यापेक्षा त्यांच्या अडचणीत भर घालत आहे. राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण या सरकारने घालवले तर मराठा समाजालाही हे सरकार आरक्षण देवू शकले नाही. या दोन्ही समाजावर आघाडी सरकारने मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे आता भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत या निष्क्रिय सरकार विरोधात आवाज उठवावा. नगर मध्ये भाजपाचे काम चांगले चालू आहे. ओबीसी मोर्च्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी किशोर डागवाले यांची नियुक्ती पक्षाल बळकटी देणारी ठरेल, असे प्रतिपादन भाजपचे नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.भाजपचे नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरला धावती भेट दिली. शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या निवासस्थानी ओबीसी मोर्च्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी किशोर डागवाले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिंनदन केले. यावेळी सरचिटणीस अॅड.विवेक नाईक, ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, नगरसेवक प्रदीप परदेशी, सागर गोरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी किशोर डागवाले म्हणाले, ओबीसी समजाचे नेते व भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला सत्कार उर्जादाई आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काम करून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे.

COMMENTS