भीक मागण्यासाठी मुलांचं अपहरण करणाऱ्या एका टोळक्याला पोलिसांनी केली अटक 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीक मागण्यासाठी मुलांचं अपहरण करणाऱ्या एका टोळक्याला पोलिसांनी केली अटक 

मुंबई प्रतिनिधी - भीक मागण्यासाठी मुलांचं अपहरण करणाऱ्या एका टोळक्याला कांजूर पोलिसांनी गजाआड केला आहे. कांजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांजुर रेल्वे

रेल्वे हमाल-माथाडींच्या मेळाव्यात एकजुटीतून संघर्षाचा नारा
दिलीप कुडके यांचा पाथरवट समाजाच्या वतीने गौरव
बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी एकास 20 वर्षाची सक्त मजूरी

मुंबई प्रतिनिधी – भीक मागण्यासाठी मुलांचं अपहरण करणाऱ्या एका टोळक्याला कांजूर पोलिसांनी गजाआड केला आहे. कांजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांजुर रेल्वे स्थानक फुटपाथ वर राहणाऱ्या वर्षा कांबळे हिचा पाच वर्षाचा मुलगा आणि एक वर्षाची मुलगी या दोघांचं अपहरण करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी पुण्याहून मुंबईकडे येताना ट्रेनमध्ये वर्षाची काळे कुटुंबीयांशी ओळख झाली होती आणि त्यांनीच आपल्या मुलांचं अपहरण केलं असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं होतं त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज च्या आधारावर काळे कुटुंबीयांचा ठाणे कोल्हापूर सांगली नगर औरंगाबाद या शहरात शोध घेऊन पाठलाग केला आणि  यांच्यातील मुख्य आरोपी हर्षद काळे याच्यासोबत ताराबाई काळे चंदू काळे या दोघांना ताब्यात घेतलं हर्षद याची बायको पौर्णिमा काळे ही सध्या फरार आहे. वर्षा हिची दोन मुले यांची सुरक्षित सुटका यांच्याकडून करण्यात आली पोलीस चौकशीत या दोन मुलांचं अपहरण भीक मागण्यासाठी केलं असल्याचं प्राथमिक दृष्ट्या समोर आलं आहे. परंतु त्यानंतर पुढे या मुलांचं हे लोक काय करायची आणि आतापर्यंत अशी किती मुले त्यांनी अपहरण केली आहेत याचा तपास सध्या कांजूर पोलीस करत आहेत. या दोन मुलांची सुटका करण्यासाठी तब्बल 11 दिवस पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला आणि अखेर त्यांची सुटका करून दोन्ही मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं. 

COMMENTS