पाथर्डीच्या पोलिस निरीक्षकासह एक कर्मचारी निलंबित ; फुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डीच्या पोलिस निरीक्षकासह एक कर्मचारी निलंबित ; फुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका

अहमदनगर/प्रतिनिधी पाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथील माजी सैनिक मच्छिंद्र फुंदे यांच्या खून प्रकरणात आरोपींना अटक करण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पाथर्डी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड व पोलिस कर्मचारी शिवनाथ बडे यांना निलंबित केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

अहमदनगर शहरात उद्या मंगळागौर उत्सवाचे आयोजन  
…तर, नगर अर्बनच्या प्रशासकांना काळे फासणार ; अर्बन बचाव कृती समिती आक्रमक पवित्र्यात
नीट नाचता येत नाही का…म्हणत केली मारहाण

अहमदनगर/प्रतिनिधी पाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथील माजी सैनिक मच्छिंद्र फुंदे यांच्या खून प्रकरणात आरोपींना अटक करण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पाथर्डी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड व पोलिस कर्मचारी शिवनाथ बडे यांना निलंबित केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

माजी सैनिक फुंदे यांच्या खुनाची घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड व पोलीस कर्मचारी बडे यांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे त्याची पोलिस अधीक्षक पाटील यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित राठोड व बडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

गाडी लावण्यावरून खून

पाथर्डी तालुक्यातून जाणार्‍या कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील टाकळीफाटा येथे हॉटेलसमोर गाडी उभी करण्याच्या कारणातून माजी सैनिक मच्छिंद्र कारभारी फुंदे यांचा खून केल्या प्रकरणातील चौघा आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सुधीर सिरसाठ (वय 26, रा. आसरानगर, पाथर्डी), आकाश वारे (वय 24, रा. शिक्षक कॉलनी पाथर्डी), आकाश डुकरे (वय 21, रा. विजयनगर, पाथर्डी), गणेश जाधव (वय 23, रा. शंकरनगर, पाथर्डी) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. 6 एप्रिल 2021ला सकाळी आरोपी सुधीर सिरसाठ याने मच्छिंद्र कारभारी फुंदे यांच्या टाकळीफाटा येथील साईप्रेम हॉटेल समोरी गाडी उभी केली होती. यावेळी फुंदे यांनी आरोपी सुधीर सिरसाठ याला हॉटेल समोरून गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून आरोपी सिरसाठ याने त्याच्या इतर साथीदारांना तेथे बोलावून घेतले. तिलोक जैन विद्यालय, पाथर्डी या शाळेच्या पाठीमागे फुंदे यांना आणून जबरदस्तीने दारू पाजून पुन्हा लोखंडी पाइप व रॉडने मारहाण करून त्यांचा खून केला. पाथर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी भादवी कलम 302, 364, 143, 147, 148, 149, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पाठलाग करून पकडले

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना आरोपी सुधीर सिरसाठ हा कानडगाव (ता.राहुरी) परिसरातील डोंगरांमध्ये त्याच्या साथीदारांसह लपून बसलेला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कानडगाव परिसरात माहिती घेऊन सापळा लावला. या दरम्यान डोंगरांमध्ये पाठलाग करून आरोपी सिरसाठ, वारे, डुकरे व जाधव यांना पकडण्यात आले. या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच या प्रकरणातील पळून गेलेला आणखी एकजण म्हणजे केतन जाधव (रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) असे त्याचे नाव सांगितले. तसेच गुन्हा केल्याची माहिती दिली. यापूर्वी आरोपी डुकरे याच्यावर जेजुरी (पुणे), कराड (सातारा) तर गणेश जाधव याच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.

COMMENTS